जुगार अड्ड्यावर छापा, ऐवज जप्त
उस्मानाबाद : उमरगा येथील बसस्थानकानजीक सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा मारला. ४ मार्च राेजी करण्यात आलेल्या या कारवाईत जुगाराच्या साहित्यासह राेख १ हजार ३३० रुपये जप्त करण्यात आले. या प्रकरणी मलाप्पा व्हसाेदाेड्डी, बशीर कासीम शेख (रा. उमरगा) या दाेघांविरुद्ध उमरगा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
अवैध दारू विक्री, गुन्हा दाखल
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील नायगाव येथील सुरेश महादेव गरड हे ४ मार्च राेजी नायगाव शिवारातील बाळासाहेब शिंदे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडजवळ देशी दारूच्या बाटल्यांसह आढळून आले. या प्रकरणी शिराढाेण पाेलीस ठाण्याच्या पथकाने त्यांच्याविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत ४१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच गरड याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
महिलेचा विनयभंग, तरुणावर गुन्हा
उसमानाबाद : जिल्ह्यातील एका गावातील तरुणाने वृद्धेच्या घरात घुसून तिच्या सुनेचा विनयभंग केला. तसेच संबंधित तरुणांच्या साथीदाराने वृद्धेसह तिच्या सुनेला शिवीगाळ केली. ही घटना ३ मार्च राेजी घडली. या प्रकरणी वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.
कारची दुचाकीला धडक
उस्मानाबाद : भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ही घटना वाशी तालुक्यातील कन्हेरवाडी फाटा येथे घडली. केळेवाडी येथील किरण नरहरी चाेथवे हे दुचाकीवरून कन्हेरवाडी फाटा येथील रस्ता ओलांडत हाेते. याचवेळी अज्ञात चालकाने आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जमखी झाले. या प्रकरणी ४ मार्च राेजी अज्ञात चालकाविरुद्ध वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणावरून केली मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणाचे कारण पुढे करीत शहरातील सुनील अंबेकर, कुलदीप कदम व अन्य एक व्यक्ती अशा तिघांनी ३ मार्च राेजी गणेश बबन जाधव यांना ठार मारण्याच्या उद्देशाने काठीने बेदम मारहाण केली. या प्रकरणी गणेशचे पिता बबन श्रीरंग जाधव यांनी आनंदनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून उपराेक्त तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पाेलीस करीत आहेत.