शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST

अपघातात एक ठार, एकजण गंभीर उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील सोमनाथ अंगद शिंदे यांनी २३ फेब्रुवारी रोजी हंगरगा ...

अपघातात एक ठार, एकजण गंभीर

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील मंगरुळ येथील सोमनाथ अंगद शिंदे यांनी २३ फेब्रुवारी रोजी हंगरगा (तुळ) फाटा चौकातील वळणावर त्यांच्या ताब्यातील वाहन (क्र. एमएच १३- एझेड ८०५२) निष्काळजीपणे चालवून (क्र. एमएच २५- झेड १६७७) या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात उस्मानाबाद येथील दुचाकीचालक गणेश उत्तम काळे (वय २२) हे मयत झाले तर पाठीमागे बसलेले काशीनाथ राजाराम पवार हे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी काशीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कारच्या धडकेत एकजण जखमी

उस्मानाबाद : कारच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची घटना शहरातील भानुनगर पाटीजवळ ५ फेब्रुवारी रोजी घडली. येथील धनंजय निवृत्ती जाधव हे भानुनगर पाटीजवळ थांबले असताना (क्र.एमएच २५- आर ४६७८) या क्रमांकाच्या कारचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून जाधव यांना जोराची धडक दिली. या अपघातानंतर नमूद कारचा चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी धनंजय जाधव यांनी १ मार्च रोजी दिलेल्या फिर्यादीवरून येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्ता वापरावरून एकास मारहाण

उमरगा : तालुक्यातील पळसगाव येथील प्रवीण माधव काळे हे २४ फेब्रुवारी रोजी त्यांच्या शेतात काम करीत होते. यावेळी गावकरी माधव, दिलीप व विजय सूर्यवंशी या तिघा बंधुंसह सौदागर व युवराज सोमवंशी, महेश मुंगळे, बाळू सुरवसे यांनी शेतातील रस्त्याच्या वापरावरून प्रवीण काळे यांना मारहाण केली. यात प्रवीण यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. याप्रकरणी प्रवीण काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिकाच्या वाटणीवरून दोन गटांत मारहाण

उस्मानाबाद : हरभरा पिकाची अर्धी वाटणी करण्याच्या कारणावरून सारोळा (बु) येथील तृप्ती राजाभाऊ देवगिरे यांच्यासह कुटुंबीयांचा गावकरी रेखा गौतम मोहीरे व त्यांच्या कुटुंबीयांशी २३ फेब्रुवारी रोजी शेतात वाद होऊन याचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी दोन्ही कुटुंबातील महिला, पुरुषांनी परस्परविरोधी गटातील महिला, पुरुषांना शिवीगाळ करून मारहाण केली. यावरून दोन्ही कुटुंबातील महिला सदस्यांनी दिलेल्या दोन स्वतंत्र फिर्यादीवरून गुन्हे दाखल झाले आहेत.

जुन्या वादातून फावड्याने मारहाण

उस्मानाबाद : जुन्या वादातून एकाच्या डोक्यात उलट्या फावड्याने घाव घालून व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील ढोकी येथे २७ फेब्रुवारी रोजी घडली. ढोकी येथील प्रवीण टेकमन पटेल हे त्यांच्या घरासमोर बसले असताना जुन्या वादातून गावकरी स्वप्निल कावळे ऊर्फ चिट्ट्या याने प्रवीण यांच्या डोक्यात उलट्या फावड्याने घाव घालून व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी प्रवीण पटेल यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या तक्रारीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोलीकरण पूर्ण

तुळजापूर : येथील गंकज शहाणे यांनी स्वखर्चातून बोरी धरणाच्या उगमापासून खोलीकरणाचे काम सुरू केले आहे. याला नागरिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळत असून, मंगळवारपर्यंत सुमारे पाच किमी खोलीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

अपघाताचा धोका

उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील भोगावती कठडे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीत वाहून गेले. यामुळे सध्या हा पूल धोकादायक बनला असून प्रशासनाने याकडे लक्ष देऊन कठडे बांधून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

वाहनधारक त्रस्त

उस्मानाबाद : शहरातील समता नगर भागात सह्याद्री कॉर्नर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यानच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यातील काही खड्डे अत्यंत धोकादायक बनले असून, ते बुजवून घ्यावेत, अशी मागणी होत आहे.

मंदिरात स्वच्छता

तुळजापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता व सॅनिटायझेशन मोहीम राबविली. या अभियानात देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांनीदेखील उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.

धनके याची निवड

तुयजापूर : सिंदफळ येथील पैलवान दत्तात्रय ऊर्फ बबलू महादेव धनके याची पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ५७ किलो वजनगटातून निवड झाली आहे. धनके हा सध्या वस्ताद सुंदर जवळगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.