शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खत, पेट्रोल भडकले, सामान्यांचे जगणे महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच खताच्या किमतीतही भरमसाठ वाढ केल्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. तसेच खताच्या किमतीतही भरमसाठ वाढ केल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत आल्याचा दावा करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. उस्मानाबादेतही पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

देशावर कोरोनाचे महासंकट घोंगावत असताना, केंद्र सरकारने खताच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. १०:२५:२६ खताची किंमत ६०० रुपयांनी वाढवली आहे. डीएपीची किंमत ७१५ रुपयाने वाढवून १,९०० रुपये केली आहे. तसेच डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रॅक्टरद्वारे नांगरणी, कुळवणी व इतर मशागतीच्या किमतीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आली आहे. शिवाय कृषीमाल वाहतुकीच्या दरातही वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसत आहेच. मात्र, सर्वसामान्यांनाही हा माल जादा दराने विकत घ्यावा लागत आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीनेही उच्चांक गाठल्याने सर्वसामान्यांचा आर्थिक कणाच मोडल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्व बाबींची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी लावून धरली. यावेळी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेधही नोंदविण्यात आला. दरम्यान, निदर्शने केल्यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्याकडे देण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, संजय निंबाळकर, संजय दुधगावकर, नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, गणेश खोचरे, बबलू शेख, सचिन तावडे, नंदकुमार गव्हाळे, ईस्माईल काझी, गौस तांबोळी, अमोल सुरवसे, खादर खान, राॅबिन बगाळे, अशोक पेठे, नितीन बागल, खलील पठाण, अभिजीत वटकर सहभागी झाले होते.