शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन शिव्या दिल्याने उचलले टोकाचे पाऊल; वृद्धाच्या खुन्यास १२ तासांत ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 17:34 IST

Murder News

- बाळासाहेब स्वामीईट (जि. उस्मानाबाद) : ईट येथील एका ६० वर्षीय वृद्धाच्या डाेक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता उघडकीस आली हाेती. यानंतर पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून अवघ्या बारा तासांत आराेपीस बेड्या ठाेकल्या. याप्रकरणी एकाविरुद्ध वाशी पाेलीस ठाण्यात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील ईट गावाला लागून जाणाऱ्या आंदरूड रस्त्यालगत आमराई आहे. याच आमराईमध्ये २२ जानेवारीच्या सायंकाळी ईट येथील विठ्ठल साेनबा चव्हाण (वय ६०) यांचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर ईटसह परिसरात खळबळ उडाली हाेती. ही घटना वाशी पाेलीस ठाण्यासह पाेलीस अधीक्षक कार्यालयाला समजताच जिल्हा पाेलीस अधीक्षक राज तिलक राैशन, उपविभागीय पाेलीस अधिकारी विशाल खांबे, वाशी ठाण्याचे पाे. नि. उस्मान शेख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करून तपासाला गती दिली. 

यानंतर अवघ्या बारा तासांत ईट येथील दत्तात्रय लिमकर यांच्याकडे सालगडी असलेल्या आरिफ निसार साैदागर (२१, रा. वेताळ गल्ली, तुळजापूर, ह.मु.ईट) यास संशयावरून ताब्यात घेण्यात आले. ‘मयत विठ्ठल चव्हाण हे दारू पिऊन आपणाला शिव्या देत हाेते. याच रागातून त्यांचा खून केला,’ अशी कबुली साैदागर याने दिल्यानंतर पाेलिसांनी त्यास अटक केली. याप्रकरणी वाशी पाेलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पाे. हे.काॅ. एस. सी. घाेळसगाव, गाेरख टकले, अच्युत कुटे, अशाेक करवर करीत आहेत.