उस्मानाबाद : प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे, असे मत जाफरपूर (नवी दिल्ली) येथील नेताजी सुभाषचंद्र तंत्रज्ञान विद्यापीठाचे स्थापत्य विभागाचे प्रा. डॉ. महादेव पाटील यांनी व्यक्त केले.
येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय आयोजित जागतिक जल दिनाच्या ऑनलाइन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, उपप्राचार्य प्रा. एम.डी. पाटील, स्थापत्य विभागाचे विभागप्रमुख प्रा. शीतल पवार, कार्यक्रम समन्वयक प्रा. पूजा लटके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी प्राचार्य डॉ. माने, विभागप्रमुख प्रा. शीतल पवार, प्रा. पूजा लटके, प्रगती सिरसाट यांनीही विचार व्यक्त केले. सूत्रसंचालन संयोगिता गेहलोत आणि सकिना पटेल या विद्यार्थिनींनी केले. आभार सुमेया शेख हिने मानले, तर तांत्रिक बाजू निसार शेख या विद्यार्थ्यांनी सांभाळली. कार्यक्रमासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. पूजा लटके, तसेच स्थापत्य विभागाच्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.