शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

शेजाऱ्याकडून वीज घेतली तरी दाखल होऊ शकतो चोरीचा गुन्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

उमरगा : तालुक्यात वीज वितरण कंपनीचे कृषी, औद्योगिक, वाणिज्य, घरगुती या वर्गवारीतील वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना महावितरणकडून ...

उमरगा : तालुक्यात वीज वितरण कंपनीचे कृषी, औद्योगिक, वाणिज्य, घरगुती या वर्गवारीतील वीज ग्राहक आहेत. या वीज ग्राहकांना महावितरणकडून महिनाभर वीजपुरवठा केला जातो. त्यापोटी वीज बिल देण्यात येते. मात्र, या बिलापासून मुक्तता मिळावी, यासाठी ग्रामीण भागात बहुसंख्य वीजग्राहक शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतात. तसेच घरगुती वापरासाठी घेतलेला विद्युतपुरवठा बऱ्याच वेळा दुकानात वाणिज्य कारणासाठी वापरला जातो. हा गुन्हा आहे. शिवाय, शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेणे हे देखील अनधिकृत असून, असा प्रकार आढळल्यास वीज ग्राहक व संबंधितावर वीज वितरण कंपनीच्या वतीने कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वीज ग्राहकांनी आपला वीजपुरवठा शेजाऱ्याला न देता अधिकृतपणे वीज जोडणी घेण्यासाठी संबंधितास प्रवृत्त करावे, असे आवाहन वीज वितरण कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणकडून वर्षभरात झालेली कारवाई

प्रकरणे युनिट चोरी दंड वसुली

शहर निरंक निरंक निरंक

ग्रामीण २१ १.२६ लक्ष ०.३९ लक्ष

एकूण २१ १.२६ लक्ष ०.३९ लक्ष

कायदा काय सांगतो ?

एखाद्या वीज ग्राहकाने शेजाऱ्याला अनधिकृतपणे वीज जोडणी दिल्यास, वीज वितरण कंपनीच्या २००३ मधील कायद्यानुसार १२६ कलमांतर्गत मीटरमध्ये छेडछाड करणे, अनधिकृत वीज जोडणी घेणे, शेजाऱ्याला वीज देणे असे प्रकार आढळून आल्यास संबंधित वीज ग्राहक व इतरांवर गुन्हा दाखल होऊ शकतो, असे महावितरणचा कायदा सांगतो.

■चोरी कळवा, दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा

वीज वितरण कंपनीचे मोठ्या संख्येने वीज ग्राहक आहेत. या ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. या थकबाकीमुळे अडचणीत आलेल्या महावितरण कंपनीला अनधिकृत वीजचोरी, वीज गळती यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या वतीने अनधिकृत वीज चोरीला आळा घालण्यासाठी ‘चोरी कळवा दंडातील १० टक्के रक्कम बक्षीस मिळवा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

शेजाऱ्यांकडून अथवा घराची वीज दुकानासाठी जात असेल, तर तोही गुन्हा ठरतो. संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येत आहे. यात थकबाकीदार ग्राहकाने शेजाऱ्यांकडून विजेचा वापर केल्यास व शेजाऱ्याने परस्पर वीजपुरवठा केल्यास दोघांवरही कलम १२६ नुसार कारवाई करण्यात येते. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होऊन संबंधितांना अटकही होऊ शकते. या वीज चोरीच्या प्रकरणात गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.

- आर. एन. शेंडेकर, उपकार्यकारी अभियंता, उमरगा