प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सुभेदार दिगंबर बनसोडे यांच्या हस्ते पंचशील बुद्ध विहार कमिटीच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविक एस. के. गायकवाड यांनी तर आभार महादेव वाघमारे यांनी केले.
यावेळी निवडण्यात आलेली पंचशील बुद्ध विहार कमिटी कार्यकारणीमध्ये अध्यक्ष नागनाथ बनसोडे, उपाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, आकाश झेंडारे, सचिव एस. के. गायकवाड, सहसचिव रमेश वाघमारे, कार्याध्यक्ष सहदेव वाघमारे, कोषाध्यक्ष भारत वाघमारे, सदस्य रावसाहेब वाघमारे, महादेव वाघमारे, सल्लागार मधुकर वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, अनिल वाघमारे, उत्तम झेंडारे, मोहन वाघमारे, वाल्मिक वाघमारे आदींची निवड करण्यात आली. यावेळी हणमंत वाघमारे, दत्तात्रय झेंडारे, पांडुरंग बनसोडे, लक्ष्मण झेंडारे, शिवाजी वाघमारे, कुंडलिक वाघमारे, उज्ज्वला वाघमारे, ठकुबाई वाघमारे, श्रीदेवी वाघमारे, कविता गायकवाड, वंदना वाघमारे, कमल धाडवे, कविता वाघमारे उपस्थित होते.