शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद गटनिहाय कोविड सेंटरसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:34 IST

ग्रामीण भागातील वाढते संक्रमण लक्षात घेऊन मोठया गावांत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आवाहन आपण २४ एप्रिल रोजीच केले ...

ग्रामीण भागातील वाढते संक्रमण लक्षात घेऊन मोठया गावांत कोविड केअर सेंटर सुरु करण्याचे आवाहन आपण २४ एप्रिल रोजीच केले होते. शिवाय, २६ एप्रिल रोजी झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत तसा प्रस्तावही मांडला होता. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून आयसोलेशन सेंटरला परवानगी देण्यात आली. जिल्ह्यात १८ गावांमध्ये असे अलगीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहेत. दरम्यान, रविवारी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने परिपत्रकाद्वारे ग्रामीण भागात कोविड केअर सेंटर सुरु करण्यावर भर देण्याचे सूचित केले आहे. प्रत्येक केंद्रात अनिवार्य सुविधा, आरोग्य कर्मचारी व इतर बाबी सुस्पष्ट केल्या आहेत. यामुळे सध्या चालू असलेल्या अलगीकरण केंद्रांना अधिकच्या सुविधा उपलब्ध करून ग्रामीण कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरित करणे सोपे होणार आहे.

तेरमध्ये सध्या ७० खाटांचे अलगीकरण केंद्र कार्यान्वित आहे. लोकसहभाग व प्रशासनाच्या सहकार्याने सुरु असलेले हे केंद्र कोविड केअर सेंटर मध्ये रुपांतरीत करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. आता प्रत्येक जिल्हा परिषद गटनिहाय एक कोविड केअर सेंटर सुरु करण्याची गरज आहे. नवीन निकषाप्रमाणे कोविड केअर सेंटरसाठी किमान २ खाटांना ऑक्सिजन सुविधा, पूर्णवेळ ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेची सेवा, रॅपिड टेस्टची सोय, संशयित रुग्णांसाठी वेगळा कक्ष व पर्याप्त औषधांचा साठा उपलब्ध करणे अनिवार्य आहे. या केंद्रांमुळे संक्रमण रोखण्यास मदत होणार असल्याने जिल्हा परिषद सदस्यांसह लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.