शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

केंद्र सरकारमुळेच ओबीसीसह मराठा समाजाचे आरक्षण गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने ...

उस्मानाबाद -केंद्र सरकारने १०२ वी घटना दुरुस्ती करून ओबीसी समाजासह मराठ्यांचेही आरक्षण संपविल्याचा घणाघात शंकरराव बाेरकर यांनी केला. भाजपाने आरक्षण मिळवून न दिल्यास आगामी निवडणुकीत हा समाज त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

उस्मानाबादेत २४ जुलै राेजी ओबीसी आरक्षण बचाव जागर मेळावा घेण्यात आला. यावेळी ते बाेलत हाेते. मंचावर आ. राजेश राठोड, बाळासाहेब सानप, राजाभाऊ मुंडे, नवनाथ पडळकर, रामराव वडकुते, प्रा. सुशीलाताई मोराळे, शिवानंद कथले, धनंजय ओंबासे, सुखदेव भालेकर, खलिफा कुरेशी, रंगनाथ दुधाळ, लक्ष्मण माने, धनंजय राऊत, रवी कोरे, पांडुरंग लाटे, सोमनाथ गुरव, बाबा मुजावर, इम्तिहान बागवान, डॉ. नवनाथ दुधाळ, शरद कोळी, सोमनाथ काशीद, अरुण खरमाटे, प्रकाश राठोड, बबनराव तायवाडे, राजेंद्र राख, बाळासाहेब पांचाळ, अक्षय ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.

बोरकर म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसी समाजाची जनगणना करण्याचा आयोगाने अहवाल दिला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांनीदेखील ओबीसी समाजाची जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. तर तत्कालीन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या अध्यक्षतेखाली १६ खासदारांच्या समितीने ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, असा अहवाल दिला होता. मात्र याची अंमलबजावणी केली नसून त्या सर्व अहवालास केराची टोपली दाखवली आहे. भाजपची मंडळी अतिशय बुद्धिमान व हुशार असून ती दिलेल्या शब्दाला प्रमाण मानणारी आहे. मग ओबीसी आरक्षणाचा शब्द गेला कुठे? असा परखड सवालही त्यांनी भाजपाला केला. ओबीसी घटकांतील बारा बलुतेदाराप्रमाणेच भाजपाने सर्वात जास्त नुकसान मराठा समाजाचेही केले आहे. त्यांना नोकरी, धंदा नाही. मग त्यांनी करायचे काय, असा सवाल करीत केंद्रातील भाजपा सरकारने आरक्षण पूर्ववत करावे. अन्यथा २०२४ च्या निवडणुकीत समाजबांधव त्यांना जागा दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असा इशाराही दिला. यावेळी प्रा. सुशीलाताई माेराळे यांनीही मत मांडले. १९३१ साली इंग्रजांनी ओबीसींची जनगणना केली नसती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये ३४० कलम घातले नसते तर ओबीसींना अजिबातच आरक्षण मिळाले नसते. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे डोंगराएवढे ओबीसी समाजावर उपकार आहेत. तसेच ७ ऑगस्ट १९९० ला तत्कालीन प्रधानमंत्री व्ही.पी. सिंग यांनी मंडल आयोग लागू केल्यामुळे प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. ओबीसी समाजाची बाजू घेणाऱ्या नेतेमंडळींना भाजपच्या मंडळींनी तुरुंगात डांबण्याचे काम केले आहे. ओबीसींना खरा न्याय देण्याचे शेवटचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. १५ ऑगस्टला गावागावात ओबीसी आरक्षण संदर्भात मेळावे घेऊन ग्रामसभा, नगर परिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत ठराव पारित करून सरकारवर दबाव तंत्राचा वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी डाॅ. नवनाथ दुधाळ, सुखदेव भालेकर, शरद कोळी, राजेंद्र राख, बालाजी शिंदे रामराव वडकुते, दादासाहेब मुंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक स्वागताध्यक्ष शिवानंद कथले यांनी तर सूत्रसंचालन पांडुरंग लाटे यांनी व उपस्थितांचे आभार डॉ. नवनाथ पडळकर यांनी मानले. या जागर मेळाव्यास जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.