शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आज १५ केंद्रांवर मिळणार कोव्हॅक्सिनचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:23 IST

उस्मानाबाद : कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना ...

उस्मानाबाद : कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असली तरी अद्याप कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाने १५ केंद्रावर कोव्हॅक्सिनचा डोस उपलब्ध करून दिला असून, यापैकी १२ केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटास तर ३ केंद्रावर ४५ वर्षांपुढील नागरिकांना लस मिळणार आहे. जून महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र, कोराना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सजग नागरिक कोविड प्रतिबंधात्मक लस घेण्यास पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने ग्रामीण तसेच शहरी भागात वेगाने लसीकरण मोहीम राबविली जात आहे. शनिवारी जिल्ह्यातील १५ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना सहा ग्रामीण रुग्णालये, चार उपजिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय या ठिकाणी लस देण्यात येणार आहे. तर उस्मानाबाद येथील वैराग रोड व राम नगर भागातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर व पोलीस रुग्णालयात ४५ वर्षांपुढील नागरिक, आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस दिली जाणार आहे. या तीन केंद्रावर ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग, दुर्धर आजार असलेल्या नागरिकांना प्राधान्य असणार आहे.