शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाकाळात घटले डॉक्टरांचे वजन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST

उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अग्रभागी येऊन दिवस-रात्र सेवा बजावत आहेत. कोरोना काळात वाढलेला कामाचा ...

उस्मानाबाद : कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर व आरोग्य कर्मचारी अग्रभागी येऊन दिवस-रात्र सेवा बजावत आहेत. कोरोना काळात वाढलेला कामाचा व्याप, त्यामुळे होणारी धावपळ या कारणामुळे डॉक्टरांचे वजन घटले असल्याचे समोर आले आहे. अनेक डॉक्टर आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सकस आहार व नियमित व्यायामावर भर देत आहेत. जिल्ह्यात गतवर्षी मार्च महिन्यापासून राज्यात कोरोना विषाणू संसर्गाने शिरकाव केला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हा आजार नवाच होता. आजारावर

औषध तसेच प्रारंभी लसही नव्हती. त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने लागणारी साधन सामग्रीही अपुरीच

होती. शिवाय, आरोग्य विभागात डॉक्टरांचे रिक्त पदेही होती. अशा स्थितीतही डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णसेवेला प्राधान्य देत कोरोनाशी दोन हात देत आहेत. वेळप्रसंगी डॉक्टरांना १२ ते २४ तासही ड्युटी करावी लागत आहे. या काळात कामाचा वाढलेला व्याप, त्यामुळे होणारी धावपळ, यामुळे डॉक्टरांचे आरोग्याकडेही दुर्लक्ष होऊ लागले. परिणामी, अनेक डॉक्टरांचे ५ ते १० किलो वजन घटले आहे. दरम्यान, सध्या डॉक्टर आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी सकस आहार, योगासने, नियमित व्यायाम करण्यावर भर देत आहेत.

पॉईंटर्स

जिल्हा रुग्णालय - १

डॉक्टर्सची संख्या - ३३

आरोग्य कर्मचारी - २०००

प्रतिक्रिया

कोरोना काळात कामाचा अधिक ताण वाढला. कोविड कक्षात काम करीत असताना दोन वेळेस राऊंड घेणे, मॉनिटर करणे, ऑक्सिजनचा पुरवठा होतो का नाही, याची पहाणी करणे, तसेच क्रिटिकल रुग्ण रेफर करणे अशी नियमित १२ तासांची ड्युटी आहे. त्याचबरोबर विविध बैठकांना उपस्थित राहणे. त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्षही झाले होते. १४ महिन्यांपूर्वी माझे ७८ किलो वजन होते. सध्या ७४ किलो वजन झाले आहे. आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी अर्धा तास योगा व विपश्यना करीत आहे.

डॉ. रवींद्र पापडे, कान-नाक-घसा तज्ज्ञ, उस्मानाबाद

ऑक्टोबर २०२० मध्ये कोविड रुग्णालयात सेवेवर रुजू झालो. त्यावेळी माझे वजन ९० किलो होते. कामामध्ये जेवणाकडेही दुर्लक्ष झाले.

त्यामुळे आता वजन ८० किलो इतके झाले आहे. नियमित व्यायाम करूनही वजन कमी होत नव्हते. कोविडच्या कामामुळे वजन कमी झाले आहे. कोरोना काळात रुग्ण सेवा करता येत आहे. त्याचबरोबर वजनही कमी झाले आहे. वजन कमी होणे माझ्यासाठी सकारात्मक बाब आहे. सध्या निरोगी आरोग्यासाठी व्यायाम नियमित करीत आहे. डॉ. इस्माईल मुल्ला, कोविड नोडल अधिकारी, उस्मानाबाद

मागील तीन चार महिन्यांपूर्वी ऑक्सिजनचा नियमित तुटवडा निर्माण होत होता. या काळात ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा करणे, ऑक्सिजनचा किती दाबाने पुरवठा होतोय, याची जबाबदारी असल्यामुळे तारेवरची कसरत होती. त्यामुळे जेवणाच्या वेळेत बदल होत राहिला. ६० किलो वजन ६७ इतके झाले आहे. सध्या रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजन टँक उभारण्यात आल्याने कामाचा ताण कमी झाला आहे. ताण कमी करण्यासाठी सकाळी नियमित धावणे व योगा करतो.

डॉ. सतीश आदटराव, उस्मानाबाद.

सकस व पौष्टिक आहार

कामाच्या व्यापामुळे ताणतणाव वाढतो. या काळात शारीरिक व मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी डॉक्टर सकाळी धावणे, योगा, विपश्यना करून ताण घालवत आहेत. त्याचबरोबर आहाराकडेही विशेष लक्ष देत आहेत. सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवण करीत आहेत. फळे व भाज्या तसेच प्रॉटिनयुक्त आहार घेण्यावर सध्या डॉक्टरांचा कल आहे. वजन वाढू नये यासाठी तळलेले पदार्थ खाण्याचे टाळत आहेत.