शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
2
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
3
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
4
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
5
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
6
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
7
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
8
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
9
कुजबुज: मोहित कंबोज यांचा खरंच संन्यास की प्रसिद्धीसाठी स्टंट? ‘उँचे लोग, उँची पसंद’, पण...
10
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
11
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
12
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
13
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
14
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
15
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
16
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
17
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
18
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
19
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
20
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात

जिल्हा मध्यवर्ती बँकेने तेरणा सहकारी कारखाना घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST

‘एमएससी’ बँकेने दिला मसुदा -भाडेतत्त्वावर देण्यासाठी २५ ऑगस्ट राेजी अपलाेड करणार टेंडर उस्मानाबाद - भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाकडून ...

‘एमएससी’ बँकेने दिला मसुदा -भाडेतत्त्वावर देण्यासाठी २५ ऑगस्ट राेजी अपलाेड करणार टेंडर

उस्मानाबाद - भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयाकडून हिरवा कंदील मिळताच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने साडेचारशे काेटी रूपये अडकलेल्या तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या अवसायकांना नाेटीस बजावली. खुलासा येताच अवघ्या सात दिवसांत म्हणजेच १३ ऑगस्ट राेजी कारखाना बँकेने ताब्यात घेतला आहे. ही सर्व घडामाेड सुरू असतानाच कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीचा टेंडर मसुदाही ‘एमएससी’ बँकेकडून प्राप्त झाला. यानंतर १८ ऑगस्ट राेजी संचालक मंडळाची तातडीची बैठक झाली. या बैठकीत टेंडर मसुद्यावर चर्चा करण्यात आली. २४ ऑगस्ट राेजी संचालक मंडळाची पुन्हा बैठक हाेणार असून टेंडर मसुदा अंतिम केला जाईल. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, २५ ऑगस्ट राेजी थेट टेंडर अपलाेड करण्यात येणार आहे, अशी माहिती चेअरमन सुरेश बिराजदार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, संचालक बापूराव पाटील, सुनील चव्हाण, सतीश दंडनाईक, नागप्पा पाटील, संजय देशमुख, विकास बारकूल, कार्यकारी संचालक घाेणसे-पाटील आदींची उपस्थिती हाेती. चेअरमन बिराजदार म्हणाले की, जिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी आजवर अनेकवेळा प्रयत्न झाले. परंतु, तेरणा व श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यांकडे मिळून बँकेची सुमारे सहाशे काेटींच्या आसपास रक्कम अडकली आहे. त्यामुळे बँक काही उबादार्या येत नव्हती. दरम्यान, तेरणा कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीसाठी सरफेसी कायद्यान्वये नाेटीस देण्यात आली हाेती. या नाेटिसीला कारखान्याने औरंगाबाद येथील ‘डीआरडी’ काेर्टात आव्हान दिले हाेते. येथे बँकेच्या विराेधात निकाल लागला हाेता. यानंतर बँकेने मुंबई येथील ‘डीआरटी’ काेर्टात अपिल केले. या काेर्टाने स्थगिती उठविल्यानंतर तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कार्यकाळात कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी तडजाेड मसुदा तयार करण्यात आला. परंतु, त्यास शासनाची मंजुरी मिळाली नाही. म्हणून बँकेने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यास मंजुरी दिली. यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास सुरूवात करणार ताेच, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीसाठीच्या १२ काेटींसाठी कारखाना ‘पीएफ’ कार्यालयाने लिलावात काढला. यानंतर बँक पुन्हा हायकाेर्टात गेली. लिलावास स्थगिती आली. मात्र, ‘पीएफ’चे पैसे देण्यासाठी जमिनीचा लिलाव करा, असे काेर्ट सांगत हाेते. परंतु, टायटल क्लिअर नसल्याने जमीनही विकता येत नव्हती. यानंतर मार्ग काढत बँकेने थेट ‘पीएफ’ कार्यालयाशी बाेलणी सुरू केली. चर्चेदरम्यान बँकेने ठेवलेला प्रस्ताव त्यांनी मान्य केला. ‘पीएफ’ कार्यालयाचा हिरवा कंदील मिळताच, बँकेने कारखान्याचे अवसायक यांना १३ २ व १३ ४ अशा दाेन नाेटिसा बजावल्या. सात दिवसांची मुदत सरताच तेरणा कारखाना बँकेकडून ताब्यात घेण्यात आला. यानंतर लागलीच कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठीच्या घडामाेडी सुरू झाल्या. ताेवर ‘एमएससी’ बँकेचा टेंडर मसुदाही प्राप्त झाला. यानंतर बुधवारी संचालक मंडळाची तातडीची बैठक बाेलावून मसुद्यावर सविस्तर चर्चा केली. आता २४ तारखेला पुन्हा संचालक मंडळाची बैठक हाेणार आहे. यात निविदेचा मसुदा निश्चित केला जाईल. त्यानंतर लागलीच २५ ऑगस्ट राेजी टेंडर अपलाेड करण्यात येणार आहे. यामध्ये जे काेणी अधिक बाेली बाेलतील, त्यांना कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी वा पदाधिकाऱ्यांनी खाेडा न घातल्यास कारखाना सुरू हाेण्याचा मार्ग माेकळा हाेईल, असा विश्वास चेअरमन बिराजदार यांनी व्यक्त केला.