शहरातील नगरपालिकेसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तके भेट देण्याचा हा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकाच दिवशी हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने सामाजिक फंड निर्माण करण्यात आला असून, प्रत्येक शिक्षकाने महिन्याला शंभर रुपये जमा करून हा निधी या पुस्तकांसाठी खर्च करण्यात येत आहे. जे-जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत, त्यांना पुस्तकांअभावी माझे मिरीट गेले असे म्हणण्याची वेळ येऊ नये यासाठी अभ्यासपूरक पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली. भविष्यात उस्मानाबाद येथे निवडक विध्यार्थ्यांसाठी राहण्याची, भोजनाची, परीक्षेच्या क्लासची व्यवस्था देखील करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सतीश ढोणे यांनी दिली. कार्यक्रमास ॲड. हिराजी पांढरे, मुख्याध्यापक नागनाथ कांबळे, तानाजी कांबळे, बालाजी गायकवाड, भगवान गायकवाड, ॲड. म्हलारी बनसोडे, अविनाश भालेराव, संतोष सुरवसे, विनोद डावरे, उमेश कांबळे, सतीश ढोणे, आदी उपस्थित होते.
एक लाख ३३ हजार रुपयांची स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:30 IST