उस्मानाबाद - काेराेनाच्या पहिल्या लाटेत शहरी तसेच ग्रामीण भागातही अत्यंत चांगल्या पद्धतीने खबरदारी घेतली जात हाेती. एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शाेध घेणे, काेराेना टेस्ट करणे, हाेम क्वारंटाईनचा शिक्का मारणे, हाॅटस्पाॅटमधून आलेल्यांना शाळात क्वारंटाईन करणे, डाेअर-टू-डाेअर जाऊन ऑक्सिजन, तापमानाच्या नाेंदी ठेवल्या जात हाेत्या. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग आटाेक्यात आला हाेता. परंतु, सध्या ग्रामीण भागात असे काहीच हाेताना दिसत नाही. एखादा रुग्ण पाॅझिटिव्ह आल्यानंतर शेजार्याला दाेन ते तीन दिवसानंतर माहीत हाेते. हे असेच सुरू राहिल्यास शहरापेक्षाही प्रचंड गतीने काेराेना वाढेल, अशी भीती जाणकार व्यक्त करू लागले आहेत.
काेराेची पहिली लाट आल्यानंतर जिल्हाबंदी करण्यात आली. त्यामुळे हाॅटस्पाॅटमधून आलेल्या लाेकांना सुरुवातीचे पंधरा दिवस त्या-त्या गावातील शाळेत ठेवले जात हाेते. गावात एखादा रुग्ण आढळून आल्यास त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शाेध घेऊन त्यास काेराेना चाचणी करण्यास गावचे तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, काेतवाल, पाेलीस पाटील व सरपंच यांचा चमू भाग पाडत असे. एवढेच नाही तर संबंधित परिसर सील करून गल्लीबंदी केली जात असे. यानंतर आशा कार्यकर्ती, आराेग्यसेविका डाेअर टू डाेअर जाऊन लाेकांचा ताप तसेच ऑक्सिजनची तपासणी करीत हाेत्या. त्यामुळे थाेडीबहुत लक्षण दिसली तरी तातडीने तपासणी करून घेण्यास सांगितले जात असे. मात्र, सध्या ग्रामीण भागात हे चित्र अपवादानेही पाहावयास मिळत नाही. एखाद्या गल्लीतील रुग्ण आढळून आल्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांना दाेन-दाेन दिवस माहीत हाेत नाही. त्यामुळे त्याच्या संपर्कात काेण आले? कितीजण आले? त्यांना काही त्रास सुरू झाला आहे का? अशा स्वरूपाची विचारपूस करणारी यंत्रणा सध्या गावपातळीवर कार्यरत असल्याचे दिसत नाही. त्यामुळे रूग्णांच्या संपर्कात आलेली मंडळीही बिनदिक्कतपणे कुटुंबात, गावात वावरताना दिसत आहे.
चाैकट...
आशा, आराेग्य कर्मचाऱ्यांचीच धावपळ...
सध्या ग्रामीण भागात मानधन तत्त्वावर असलेल्या आशा कार्यकर्ती व आराेग्य केंद्र, उपकेंद्रातील कर्मचाऱ्यांचीच धावाधाव सुरू असताना दिसत आहे. महसूल, जिल्हा परिषदेेने गावपातळीवरील आपल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून ‘आराेग्य’ला साथ देण्याबाबत आदेशित करायला हवे. परंतु, तसेही अद्याप झालेले नाही. अनेक गावांतील कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नाहीत. त्यामुळे गावात काय चाललेय? याचीही त्यांना खबर नाही. असे प्रकार आता समाेर येऊ लागले आहेत. काही गावांत लेखी तक्रारी झाल्या आहेत.
काेराेना कक्षांचाही नाही पत्ता...
पहिल्या लाटेत गावपातळीवर २४ तास काेराेना कक्ष कार्यरत हाेते. त्यामुळे गावात एकही रुग्ण आढळला तरी संपूर्ण यंत्रणा कामाला लागत हाेती. एवढेच नाही तर हाॅटस्पाॅटमधून आलेल्या लाेकांवरही नजर ठेवली जात असे. टेस्ट केल्याशिवाय त्यांना माेकळीक दिली जात नसे. परंतु, सध्या हे अपवादानेही ताेताना दिसत नाही, हेही कारण रुग्णसंख्या वाढीस पूरक ठरू लागले आहे.
गावामध्ये काेणाचा वाॅच?
गावामध्ये एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर ग्रामसेवक, तलाठी, कृषी साहाय्यक, पाेलीस पाटील, काेतवाल, शिक्षक, आदी प्रमुख अधिकाऱ्यांनी पुढे येऊन उपायाेजना राबविणे गरजेचे आहे. पहिल्या लाटेत तसे हाेत हाेते. परंतु, सध्या गावात काेणाचा वाॅच आहे? हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून पंचायत समित्यांकडे तक्रारी हाेऊ लागल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
काॅन्टॅक्ट ट्रेसिंग नाहीच...
सध्या गावात एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यास उपचारासाठी ॲडमिट करून घेतले जाते. यानंतर काॅन्टॅक्ट ट्रेसिंग हाेणे गरजेचे आहे. परंतु, तूर्तास तसे हाेताना दिसत नाही. ‘‘मी अमुक व्यक्तीच्या संपर्कात आलाे आहे. माझीही चाचणी करा’’, असे म्हणत चाचणी सेंटरवर गेल्यानंतर संपर्कातील व्यक्ती समाेर येत आहेत. हे अत्यंत धाेकादायक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने याबाबतीतही पावले उचलणे गरजेचे आहे.
काेट...
पहिल्या लाटेप्रमाणेच आताही उपाययाेजना करणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार नुकतेच पत्र काढले आहे. गावपातळीवर एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर त्यास दवाखान्यात दाखल करण्यापासून ते संपर्कातील व्यक्तींचा शाेध घेऊन त्यांची चाचणी करून घेण्यापर्यंतच्या घेण्याबाबत सांगितले आहे.
-डाॅ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आराेग्याधिकारी.
०००
जिल्ह्यातील एकूण रुग्ण
०००
ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या
००००
गावांमध्ये हाेम आयसाेलेशनमध्ये असलेले रुग्ण