पीपीई कीटचा दर्जा शंकास्पद...
जिल्हा रुग्णालयात मृत्युमुखी पडलेले मृतदेह पीपीई कीटमध्ये गुंडाळून पोस्ट मार्टम रुमकडे आणले जात होते. यावेळी स्ट्रेचरवर जात असलेल्या मृतदेहाभोवती गुंडाळण्यात आलेल्या पीपीई कीटची चेन स्लीप झालेली दिसून आली. त्यामुळे मृतदेहाचे पाय बाहेर सहजतेने दिसून येत होते. पीपीई कीटमध्ये वावरणार्या काही कर्मचार्यांचे कीट पायाकडील बाजूस लवकरच फाटून गेल्याचेही दिसून आले.
हा बेजबाबदारपणा भोवतोय...
जिल्हा रुग्णालयातील कोविड इमारतीत मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आला आहे. मात्र, त्याचे कोणी ऐकत नाही अन् तोही कोणाला हटकत नाही, असेच दृश्य दिसून आले. त्यामुळे अगदी कोविड वार्डापर्यंत नातेवाईकांचा वावर सुलभ होता. हेच नातेवाईक केवळ मास्क परिधान करुन बाहेर बिनधास्त वावरताना दिसून आले. यावर कडी म्हणजे, प्रवेशद्वारालगत अनेकजण सुपार्यांचा तोबरा थुंकताना दिसून आले. यात तेथे काम करणारा एक कर्मचारीही होता.