शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षात पाचशे जणांना नृत्याचे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:24 IST

उस्मानाबाद : भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा कलावविष्कार असलेल्या नृत्याचे अनेक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्हा हा ग्रामीण भागात ...

उस्मानाबाद : भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचा कलावविष्कार असलेल्या नृत्याचे अनेक प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत. मात्र, उस्मानाबाद जिल्हा हा ग्रामीण भागात मोडत असल्याने ग्रामीण भागातील मुला मुलींपर्यंत ते पोहचले नव्हते. त्यामुळे अनेक मुलांच्या कलागुणांना वाव मिळत नव्हता. नवी पिढी नृत्य क्षेत्रात ठसा उमटवता यावा, यासाठी प्रयत्न करण्याचा ध्यास नृत्य परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष संगीता पाटील यांनी घेतला आहे. मागील दहा वर्षात ५०० जणांना नृत्य क्षेत्रात पारंगत केले आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन त्यानिमित्त घेतलेला आढावा. कलासंस्कृतीमध्ये नृत्य हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. लोकनृत्याचा वारसाही देशात लाभलेला आहे. असे असतानाही सर्वसामान्यांमध्ये नृत्याविषयी जागरुकता दिसून येत नाही. उस्मानाबाद जिल्हा ग्रामीण भागात मोडत असल्यामुळे नृत्य क्षेत्रात वाव मिळत नव्हता. त्यात मुली व महिलांपासून तर हे क्षेत्र दूरच राहत होते. नृत्य मुली व महिलांनाही शिकता यावे, यासाठी डान्स क्लासेस सुरु केले. प्रथम शिकवणीस ३ ते ५ वर्ष वयोगटातील मुली येत असत. मागील तीन चार वर्षापासून या ठिकाणी ४० ते ५० वयोगटातील महिला नृत्याचे धडे घेत आहेत. पालकही सध्या पाल्यांना नृत्याचे धडे घेण्यासाठी प्रवृत्त करीत असल्याने नृत्य चळवळीला गती मिळत आहे. पाटील यांच्याकडे सध्या क्लासिकल, सेमी क्लासिकल, बॉलिवूड, वस्टर्न असे प्रकारचे नृत्यांचे विद्यार्थी धडे घेत आहेत. तसेच गरीब कुटूंबातील ज्या मुलींना नृत्य शिकण्याची आवड आहे. अशा मुलींना मोफत नृत्य शिकविले जात आहे. मागील दहा वर्षात तब्बल ५०० च्या जवळपास मुले, मुली नृत्य प्रकारात पारंगत झाले असून, विविध स्पर्धेत जिल्हाचे नावलौकित करीत आहेत.

पाटील यांचा झाला गौरव

नृत्य क्षेत्रात करीत असलेल्या कामाची दखल घेऊन ऑल डान्सर असोसिएशनच्या वतीने २०१९ मध्ये संगीता पाटील यांना राज्यस्तरीय नृत्य जीवन गौरस पुरस्कार प्रदान गौरव केला आहे. तसेच सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने २०२० मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला आहे.

पंजाबमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत उस्मानाबादचा डंका

२०१९ मध्ये पंजाब येथे स्टुडंड ऑलिम्पिक असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत

जिल्ह्यातील ५ जणांचा सहभाग असलेल्या ग्रुपने भाग घेतला होता. या स्पर्धेत कलाविष्काराचा ठसा उमटवित ग्रुपने प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच सोलो डांन्समध्ये इतर विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याने रसिकांची मने जिंकली होती.

स्वाधार मतीमंद मुलींना मोफत शिकवणी

३ डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मतीमंद मुलाच्या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा पार पडत असतात. या स्पर्धेसाठी

येथील स्वाधार मतीमंद मुलींच्या शाळेतील विद्यार्थींना स्पर्धेपूर्वी आठ ते दहा दिवस संगीता पाटील मागील पाच वर्षापासून मोफत नृत्याचे धडे देत आहेत. त्याचे फलित म्हणून मुलींनी दरवर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.