शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादेत वीज जोडणीसाठी ग्राहकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 19:05 IST

डिमांड भरूनही घरी वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या एका वीज ग्राहकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़

उस्मानाबाद : डिमांड भरूनही घरी वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या एका वीज ग्राहकाने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला़ ही घटना आज सकाळी शहरातील महावितरणच्या कार्यालयासमोर घडली़

शहरातील तांबरी विभागात राहणारे सचिन चौधरी यांनी घरी वीजजोडणी मिळावी, यासाठी काही दिवसांपूर्वी महावितरणच्या शहर कार्यालयात डिमांड भरले आहे़ डिमांड भरल्यानंतर कंपनीकडून मेसेज आला की २४ तासात वीजजोडणी मिळेल, असे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले होते़ मात्र, सलग आठ ते दहा दिवस पाठपुरावा करूनही वीजजोडणी मिळत नसल्याने संतापलेल्या सचिन चौधरी यांनी पेट्रोलची बाटली हातात घेऊन सकाळी महावितरणचे शहर कार्यालय गाठले़.

उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मीटर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा दिला जाईल, असे सांगताच चौधरी यांनी हातातील बाटलीमधील पेट्रोल अंगावर ओतून घेतले़ यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ वीजकनेक्शन देण्याचे आश्वासन दिल्यानंतर चौधरी यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरणOsmanabadउस्मानाबाद