शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या प्रमाणपत्रासाठी रुग्णालय परिसरात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

कळंब : वृद्ध नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वयाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ते मिळावे म्हणून ...

कळंब : वृद्ध नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वयाचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. ते मिळावे म्हणून कळंबच्या उपजिल्हा रुग्णालयात वृद्ध नागरिकांची गर्दी होत आहे. यामुळे यातून कोरोना संसर्गाची भीतीही वाढली आहे.

आर्थिक साहाय्य मिळावे, त्याद्वारे रोजच्या किमान गरजा भागवता याव्या व आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात परवड होऊ नये यासाठी वृद्धांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. कोरोनाकाळात सर्व यंत्रणाच ठप्प झाल्याने या योजनासाठी अर्ज केलेल्यांचे तसेच करू इच्छिणाऱ्यांचे हाल झाले. जे पूर्वी पात्र ठरले त्यांनाही कोरोनाकाळात मदत मिळाली नाही. आता शासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. प्रशासकीय कारभार बऱ्यापैकी पूर्वपदावर येतो आहे. त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांची शासकीय कार्यालयात गर्दी वाढली आहे. वृद्ध नागरिकांना मदतीचा हात म्हणून शासन स्तरावर काही योजना चालू असून, त्या योजनांचे लाभार्थी होण्यासाठी वयाची अट घालून दिली आहे. त्या वयाच्या प्रमाणपत्राचे अधिकार तालुकास्तरावरील उपजिल्हा अथवा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका असतानाही वृद्धाना कळंबकडे धाव घ्यावी लागत आहे.

या प्रमाणपत्रासाठी कळंब उपजिल्हा रुग्णालयाने बुधवार हा दिवस निश्चित केला आहे. आठवड्यातून एकच वार असल्याने ग्रामीण भागातील वृद्ध नागरिक बुधवारी रुग्णालय परिसरात गर्दी करीत आहेत. परिणामी कोरोनाच्या बचावापासून दूर रहा म्हणून सांगणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिसरातच कोरोना संक्रमण होईल का, अशी भीती आता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने प्रथम रुग्णालय परिसरातील गर्दी कमी करण्यास पुढाकार घ्यावा, अशी मागणी होते आहे. याबाबत कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्याशी दिवसभर भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय परिसरात होणाऱ्या या गैरव्यवस्थापनबाबतची भूमिका समजली नाही.

चौकट -

प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुविधेची गरज -

वयाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांना नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील वृद्धांना कळंबची वारी करावीच लागते आहे. ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात ही सोय केली, तर कोरोना प्रादुर्भाव टळू शकेल व त्या त्या भागातील नागरिकांची फरफट होणार नाही, असा सूर या वृद्ध नागरिकांतून व्यक्त होतो आहे.

290721\img_20210728_144721.jpg

कळंब उपजिल्हा रुग्णालय परिसरात वयाच्या प्रमाणपत्रासाठी तालुक्यातील वृद्ध नागरिकांनी अशी गर्दी केली होती. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.