शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

न लढणाऱ्या शेतकऱ्यांचे पीकविमा कंपन्यांनी हजारो कोटी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:32 IST

कळंब : शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण ...

कळंब

: शेतकरी संघटना विम्यासाठी कृषी आयुक्तालय, विमा कंपनीकडे लढत असते. यात विमा कंपनी आंदोलन करणाऱ्या, लढणाऱ्या शेतकऱ्यांनाच पूर्ण विमा भरपाई देेत असून, इतरांच्या खात्यावर तुटपुंजी रक्कम जमा करते. यातून आवाज न उठविणाऱ्या शेतकऱ्यांचे हजारो कोटी रूपये लुटले जातात. यामुळे शेतकऱ्यांनी लढा दिला पाहिजे, असे आवाहन

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी केले.

तालुक्यातील शेलगाव (जहागीर) येथे शेतकऱ्यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. याही वर्षी शेतकरी संघटनेने विविध राज्यस्तरीय आंदोलन केली. यानंतर शासन व कंपन्या खडबडून जाग्या झाल्या आणि राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यास सुरुवात केली. असे असले तरी १५ एप्रिलच्या आत काढणीपूर्व व काढणीपश्चात नुकसानीसाठी देय रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली नाही तर १६ एप्रिल रोजी पुन्हा मंत्रालय किंवा कृषी आयुक्तालय कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांना पात्र असतानाही यापूर्वी विमा नुकसान भरपाई मिळाली नाही, त्यांनीही आपल्या‌शी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

सभेच्या अध्यक्षस्थानी बाबुराव तवले होते. शरद भालेकर, मुकिंदा पेजगुडे, किसनराव शिनगारे, उपसरपंच पांडुरंग सोनार, सर्जेराव तवले, केशवराव तवले, जगन्नाथ बांगर, नरहरी मोरे आदींसह शेतकऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. सूत्रसंचालन नरेश तवले यांनी केले. दत्तात्रय तवले यांनी आभार मानले.