शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

भरधाव कारच्या धडकेत दाम्पत्य ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

कळंब (जि. उस्मानाबाद) - नातेवाईकाच्या तेराव्याला जात असलेल्या दुचाकीवरील ४५ वर्षीय शिक्षक व त्यांच्या पत्नीचा कारने उडवल्याने दुर्देवी ...

कळंब (जि. उस्मानाबाद) - नातेवाईकाच्या तेराव्याला जात असलेल्या दुचाकीवरील ४५ वर्षीय शिक्षक व त्यांच्या पत्नीचा कारने उडवल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंदोरा गावालगत ही घटना घडली आहे.

कळंब तालुक्यातील जवळा खुर्द येथील सुधीर विश्वनाथ लोमटे (वय ४५) हे गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास आपल्या दुचाकी (क्र. एमएच. २५-डब्ल्यू.१०९४) वरून पत्नी अनितासह ते कन्हेरवाडी येथे एका नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी चालले होते.

त्यांची दुचाकी खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील आंदोरा गावालगतच्या पुलाजवळ आली असता समोरून येणा-या (क्र. एमएच.१४-एचडी.०५६१) या कारने उडवले. या भीषण अपघातामध्ये सुधीर लोमटे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी अनिता यांना गंभीर जखमी अवस्थेत कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्यांचाही मृत्यू झाला.

सुधीर लोमटे हे एक उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या या अपघाती मृत्यूचे वृत्त समजताच मुळ गाव जवळा खुर्दसह वास्तव्यास असलेल्या कळंब शहरात व शैक्षणिक वर्तुळात हळहळ केली जात आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी कळंब पोलिस दाखल होत पुढील तपास करत होते.

चौकट...

आंदोरा येथील दुभाजकाचा विषय पुन्हा ऐरणीवर

खामगाव पंढरपूर महामार्गाचे काम करतांना संबंधित ठेकेदार कंपनीने वर्दळ नसलेल्या मस्सा ते मनुष्यबळ या भागात दुभाजक केले आहेत. मात्र स्थानिक व हायवेवरील वाहतुकीचे ‘कंजेक्शन’ होत असलेल्या आंदोरा गाव हद्दीत असे दुभाजक, रुंदीकरण न करता काम ओढले आहे. यामुळे असे अपघात यापूर्वी ही झाले आहेत. पुढील धोका कमी करण्यासाठी आता तरी कंपनीने येथे दुभाजक व रुंदीकरण करावे, अशी मागणी ग्रापं सदस्य पी. जी. नाना तांबारे यांनी केली आहे.