शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! उस्मानाबादेत कोरोनाग्रस्त महाराज रुग्णालयातून पळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 13:48 IST

तासाभराच्या धावपळीनंतर पुन्हा रुग्णालयात आणण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश

ठळक मुद्देसकाळी 11 वाजेच्या दरम्यान नजर चुकवून पलायन

उस्मानाबाद : येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या एका कोरोनाग्रस्त महाराजाने शनिवारी सकाळी रुग्णालयातून धूम ठोकली. जवळपास तासाभराने पत्ता लागल्यावर पोलीस, महसूल व आरोग्य प्रशासनाने अक्षरशः विनवण्या करून त्यास परत रुग्णालयात आणले.

उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात एका महाराजावर उपचार सुरू आहेत. शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या महाराजाने यंत्रणेची नजर चुकवून पलायन केले. ही बाब लक्षात आल्यानंतर या रुग्णाची शोधाशोध सुरू झाली. जवळपास तासाभराने हे महाराज नगरपालिकेच्या नाट्यगृहानजीक असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस, आरोग्य कर्मचारी ऍम्ब्युलन्ससह याठिकाणी पोहोचले. मात्र, महाराज काही केल्या त्यात बसेनात. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

गर्दी पाहून उस्मानाबादचे तहसीलदार गणेश माली तेथे थांबले. त्यांनी घडल्या प्रकारची माहिती घेऊन मोठ्या प्रयत्नाने महाराजांना वाहनात बसविले. त्यांना घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्यानंतरही महाराजांचा ड्रामा सुरूच होता. येथे ते खाली उत्तरायलाच तयार नव्हते. पुन्हा विनवण्या करून त्यांना कोविड वार्डात पाठविण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे मात्र धिंडवडे निघाले.

महाराजांना हवेत सेवेकरीकोरोनाग्रस्त महाराज जिल्हा रुग्णालयात त्यांची कोणीच सेवा करीत नसल्याची तक्रार मांडत होते. त्यामुळे त्यांनी त्यांचे सेवेकरी याठिकाणी सेवेसाठी बोलावून घ्या, असा लकडा लावला होता.

सुरक्षेची जबाबदारी पोलिसांचीकोणालातरी फोन करायचा आहे असे सांगून संबधित पेशन्टने पलायन केले. सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आहे, असे उत्तर या घटनेबाबत बोलताना प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डी. के. पाटील यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद