शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

CoronaVirus : कौतुकास्पद ! लोहाऱ्यात कोरोना योद्ध्यांसाठी शेतकऱ्याने खुली केली फळबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 17:14 IST

दहा एकरवरील चिक्कुची विक्री न करता कोरोनाशी दोन हात करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत केले आहे.

लोहारा (जि.उस्मानाबाद) : या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहेत. त्यात फळबागायत शेतकरी ही वेगळा नाही.अशातच एका फळबाग शेतकरी तथा सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकाऱ्यांने दहा एकरवरील चिक्कुची विक्री न करता कोरोनाशी दोन हात करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मोफत वाटप केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यात,देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आधी दुष्काळ मग अवकाळी यातून कसाबसा वाचलेला शेतीमाल आता काढणीला आला आहे. मात्र,या कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांसमोर मातीमोल होताना दिसत असल्याने शेतकरी हवालदील झाला आहेत. त्यात फळबागायत शेतकऱ्यांची व्यथा वेगळी नाही. अनेक शेतकऱ्यांचे टरबुज रानावरच सडले. तर कोणी मोफत वाटले. त्या द्राक्ष बागायतदार ही यातून सुटला नाही. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची हीच अवस्था आहेत. यामुळे आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या उद्देशाने लोहारा तालुक्यातील चिक्कू उत्पादक शेतकरी तथा सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय सुतार यांनी गेल्यावर्षी पेक्षाही यावर्षी लॉकडाऊनमध्ये चिक्कुला दुप्पट भाव असला तरी दहा एकरावरील चिक्कूची बाग ही कोरोनाशी दोन हात करत असलेल्या आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी मोकळी करुन दिली आहे. तालुक्यातील ग्रामिण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील डॉक्टर,कर्मचारी तसेच रुग्ण यांना मोफत चिक्कू देण्याचे ठरवले असून यांचा शुभारंभ तहसिलदार विजय अवधाने यांच्या हस्ते करण्यात आला आहे. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक काळे,तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग,स्पर्श ग्रामिण रुग्णालयाचे रमाकांत जोशी,सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय सुतार,दत्ता वाघमारे, राजेंद्र कांबळे,स्वामी आदी उपस्थितीत होते.

सामाजिक बांधीलकीतून उपक्रमकोरोनामुळे लॉकडाऊन सारख्या परिस्थितीत सुद्धा अनेक सामाजिक संस्था, सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते आणि अन्नदान करणारे अनेक लोक आहेत. ते जे की गरजू आणि अडचणी मध्ये सापडलेल्या लोकांच्या जेवणाची व इतर अनुषंगिक सोय करत आहेत. हे सुरू असलेले काम खरच खूप अभिमानास्पद आहे.त्यात आपण ही मदत केली पाहीजे म्हणून मी दहा एकरावरील चिक्कू हे चांगला भाव असताना ही विक्री न करता कोरोनाशी दिवस रात्र लढत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्याचे ठरविले आहे असे सुतार यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOsmanabadउस्मानाबाद