शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: एचआरसीटी स्कोअर २१ असतानाही ६० वर्षीय महिलेची कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 11:06 IST

Coronavirus: एचआरसीटी स्कोअर २१, ऑक्सिजन लेव्हल ५५ ते ६० च्या दरम्यान असतानाही रुग्णाची सकारात्मक मानसिकता आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे साठवर्षीय महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. 

कळंब (जि. उस्मानाबाद) : एचआरसीटी स्कोअर २१, ऑक्सिजन लेव्हल ५५ ते ६० च्या दरम्यान असतानाही रुग्णाची सकारात्मक मानसिकता आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रयत्न यामुळे साठवर्षीय महिलेने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. शहरातील सोनार लाइन येथे राहणाऱ्या शैलजा पाटील यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी उस्मानाबाद येथे जाऊन एचआरसीटी तपासणी केली. त्यावेळी स्कोअर २१ आला होता. ५ मे रोजी एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी त्यांना दाखल करण्यात आले. परंतु, तीन दिवसांत प्रकृती चिंताजनक झाल्यामुळे तेथील डॉक्टरांनी इतर ठिकाणी घेऊन जाण्याचा सल्ला दिला. ऑक्सिजन पातळी कमी असल्यामुळे रुग्णाला इतर ठिकाणी घेऊन जाणे धोक्याचे होते. अशा बिकट परिस्थितीत ९ मे रोजी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून व्हेंटिलेटर लावण्यात आले. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी ५५ ते ६० च्या दरम्यान होती. परंतु, ‘मला काही होणार नाही’, हा शैलजा यांचा आत्मविश्वास  आणि उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेले योग्य उपचार यामुळे शैलजा या आजारातून सुखरूप बाहेर पडल्या.   

यांची मेहनत फळालारुग्णाची प्रकृती गंभीर असतानाही वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पुरुषोत्तम पाटील, डॉ. प्रशांत जोशी, डॉ. इम्रान शेख यांनी या गंभीर रुग्णाची विशेष काळजी घेतली व डॉ. मीरा दशरथ, डॉ. गीत्ते, डॉ. निलेश भालेराव,  डॉ. सुधीर आवटे यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे दोन वेळा खा. ओमप्रकाश राजे निंबाळकर व  आ. कैलास घाडगे यांनी येऊन ‘आत्या, घाबरू नका. मला तुमच्या हाताने बनवलेला चहा प्यायचा आहे. तुम्ही धीर सोडू नका’, असे सांगून धीर दिला होता.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस