शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला कोरोनाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:32 IST

१ ते १९ वयोगटातील किमान ६८ बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच ...

१ ते १९ वयोगटातील किमान ६८ बालकांमध्ये आढळणारा आतड्याचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतूंमुळे होतो. हाच कृमीदोष रक्तक्षय आणि कुपोषणाचे कारण ठरतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींना दरवर्षी शाळा, ‌अंगवाड्यातून‌ जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातात. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अंगणवाड्या बंद आहेत. शिवाय इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंत चे वर्ग सुरू असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० ते ६० टक्के इतकीच असते. अशा परिस्थितीत जंतनाशक मोहीम राबविण्याचे मोठे आव्हान आरोग्य विभागासमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करीत घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्याचे काम केले जात आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे आरोग्य

उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

चौकट..

१,२४७ आशा स्वयंसेविकांची फौज

जिल्ह्यातील ४ लाख ४१ हजार ५१५ मुला-मुलींना शाळेतून व घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप करण्यात येत आहेत. गोळ्या वाटपासाठी १,२४७ आशा स्वयंसेविकांची फौज तैनात करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मदतीला अंगणवाडी सेविका व मदतनीस देण्यात आल्या आहेत.

आरोग्य विभागाची होतेय दमछाक

दरवर्षी शाळा ‌अंगवाड्यातून‌ जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जात होत्या. मात्र या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे अंगणवाड्या बंद आहेत. तसेच इयत्ता ४ थी पर्यंतचे वर्ग बंदच आहेत. त्यामुळे सध्या आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागांमध्येही रुग्ण वाढत असल्याने जंतनाशक गोळ्या वाटप करताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे.

कोट...

दरवर्षी शाळा, अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविली जात होती. कोरोनामुळे अंगणवाड्या बंद आहेत. शाळांना विद्यार्थी नाहीत. त्यामुळे घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जात आहेत. १ ते २ वयोगटातील मुलांना अर्धी तर २ वर्षापुढील मुलांना १ गोळी दिली जाते. या मोहिमेंतर्गत १ ते १९ वयोगटातील सर्व मुला-मुलींना गोळ्या देण्यात येणार आहेत.

डाॅ. हनुमंत वडगावे,

जिल्हा आरोग्य अधिकारी