शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधिताचा मृतदेह पाच तास रुग्णालयाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:14 IST

तेर (जि.उस्मानाबाद) : खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा दारातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथे ...

तेर (जि.उस्मानाबाद) : खासगी रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या एका व्यक्तीचा दारातच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथे घडली. यानंतर मृतदेह न्यायचा कोणी, यावरुन वादविवाद सुरू झाल्याने तब्बल पाच तास हा मृतदेह खासगी रुग्णालयाच्या दारातच पडून होता. अखेर ग्रामपंचायतीनेच पुढाकार घेऊन दुपारी मृतदेह नेत खबरदारी घेऊन अंत्यविधी केले.

उस्मानाबाद तालुक्यातील किणी येथील छगन सोनटक्के (६५) हे सोमवारी सकाळी साडेदहा वाजता तेर येथील एका खासगी डॉक्टरकडे तपासणीसाठी गेले होते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ऑक्सिजन लेव्हल कमी असल्याने ताबडतोब उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. तेथून बाहेर पडतानाच छगन सोनटक्के पायरीजवळ पडले ते निपचितच. कोरोनाचा संसर्ग असण्याची शक्यता असल्याने त्यांच्या जवळपासही कोणी फिरकायला तयार नव्हते. ही बाब तातडीने पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी तेर येथील ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यास बोलावून रॅपिड टेस्ट करायला लावली. त्यात छगन सोनटक्के हे बाधित आढळून आले. त्यानंतर मृतदेह पॅक करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयास कळविण्यात आले; मात्र हा प्रकार रुग्णालयाबाहेर घडल्याने मदत करता येणार नाही, अशी भूमिका सुरुवातीला घेण्यात आली होती;मात्र नंतर मयताचा एक नातेवाईक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा मृतदेह पॅक केला. यानंतर हा मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा यावरुन चर्वण सुरु झाले. सुरुवातीला किणी ग्रामपंचायतीनेही मृतदेह न्यायला नकार दिला. मग तेर ग्रामपंचायतीनेही ही जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थतता दर्शविली. नातेवाईकांनी एखादे वाहन दिल्यास आपणच मृतदेह नेऊ, अशी भूमिका मांडली. तेव्हा किणीच्या सरपंचांनी पुढाकार घेऊन मृतदेह सर्व खबरदारी घेत गावाकडे नेला. मात्र, तोपर्यंत जवळपास पाच तास उलटून गेले होते. सायंकाळी या मृतदेहावर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतरही त्यांची कशी अवहेलना होत आहे, याचा प्रत्यय या घटनेने सोमवारी आणून दिला.