शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: नाती तुटली पण माणुसकी जिवंत; वृध्देवर महिला तहसीलदार, बिडीओनी केला मध्यरात्री अंत्यविधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 12:46 IST

Corona Virus in Osmanabad : कर्ती माणसं दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना.

ठळक मुद्देआजीच्या अंतिम प्रवासाला माणुसकीच धावलीतहसीलदार, बीडीओ, ग्रामसेवक व अन्य एका सहकाऱ्याने देवळाली गाठली.अंगावर पीपीई किट परिधान करून हे चौघेही मृतदेह घेऊन मध्यरात्री १२ वाजता स्मशानात गेले

- चेतन धनुरे 

उस्मानाबाद : कोरोनाने माणूस माणसात ठेवला नाही. नाती, शेजारधर्माची कुंडले केव्हाचीच गळून पडलीत. आता उरलीय ती केवळ माणुसकी. याच माणुसकीचा प्रत्यय भूमच्या महिला तहसीलदार अन बिडीओनी आणून दिला. देवळाली येथील एका वृद्ध महिलेच्या अंत्यविधीला कोणीच पुढे येत नव्हते तेव्हा या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री स्वतः मातीत उतरून तिचा अंतिम प्रवास सुकर केला.

देवळाली येथील एका कुटुंबातील तिघे कोरोनाबाधित निघाले. घरातील दोन कर्ते पुरुष अन ७५ वर्षीय आजीबाईना त्रास सुरू झाला. तेव्हा भूमला तपासणी करून बार्शी येथे उपचार घेऊ असे सांगत त्यांनी भूम सोडले. आजीबाईंनी मात्र, घरीच राहण्याचा हट्ट धरला. तेव्हा ते दोघे बार्शीच्या रुग्णालयात दाखल झाले. इकडे आजींनी आजार अंगावर काढत बुधवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. घरात एक महिला अन दोन लहान मुलं होती. कर्ती माणसं दवाखान्यात. तेव्हा या मयत महिलेच्या अंत्यविधीसाठी कोणीच पुढे येईना. हा प्रकार रात्री १० वाजता तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांच्या कानी पडला. दीड तास प्रयत्न करूनही प्रश्न सुटत नव्हता. तेव्हा त्या स्वतः, बीडीओ भागवत धवलशंख यांनी ग्रामसेवक व अन्य एका सहकाऱ्यास सोबत घेऊन देवळाली गाठली. अंगावर पीपीई किट परिधान करून हे चौघेही मृतदेह घेऊन मध्यरात्री १२ वाजता स्मशानात गेले अन त्यांनीच या आजींचा अंत्यविधीही केला. एकीकडे या आजारामुळे सगळीच नाती मृतप्राय होत असताना माणुसकी अजूनही जिवंत आहे, हेच या घटनेतून प्रकर्षाने समोर आले. 

हे तर आमचे कर्तव्य... मयत आजींच्या घरातही कोणी पुरुष कर्ती माणसं नव्हती. ही घटना कळल्यानंतर अंत्यविधी करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांचा फोन लागत नसल्याने रात्रीच बीडीओ धवलशंख यांच्या सोबतीने त्यांचे घर गाठले. तेव्हा तिथेही कुटुंबात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आपणच अंत्यविधी करायचा असे ठरवून आम्ही देवळाली गाठली. मध्यरात्री अंत्यसंस्कार केले. माणुसकीच्या नात्याने आम्ही हे आमचे कर्तव्यच समजून ते पार पाडले. -उषाकिरण शृंगारे, तहसीलदार, भूम (जि. उस्मानाबाद)

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या