शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : मृत्यूदर भयावह, टोपे साहेब थोडे सासुरवाडी उस्मानाबादकडेही लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 14:16 IST

Corona Virus : अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे येथील भार वाढला असून, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे.

ठळक मुद्देमराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला असता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४० टक्के मृत्युदर आहे. वरिष्ठ अधिकार्यांसह बैठक घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना करुन द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. पाटील यांनी केली आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील मृत्यूदर हा काळजीत भर टाकणारा आहे. लोकसंख्येच्या बाबतीत मराठवाड्यात खालून दुसरा असलेल्या या जिल्ह्याचा मृत्यूदर मात्र वरुन पहिला आहे. आरोग्य यंत्रणेची मनुष्यबळाअभावी वाताहत होत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी जालन्यानंतर का होईना उस्मानाबादकडे लक्ष देण्याची गरज आहे. दरम्यान, याबाबत आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीही पत्र लिहून टोपेंची सासरवाडी असलेल्या उस्मानाबादची आरोग्य यंत्रणा बळकट करावी, अशी मागणी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात १० मे पर्यंत एकूण बाधित रुग्णसंख्या ४५ हजार ५३१ झाली असून, उपचाराधीन रुग्णांची संख्या ६ हजार ६९६ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे १ हजार ७७ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद औरंगाबाद विभागाच्या डॅशबोर्डला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ४३ हजार ३४७ चाचण्या झाल्या आहेत. यातून जवळपास ३४.४८ टक्के अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. ९ मेच्या अहवालात तर आरटीपीसीआर टेस्टपैकी निम्मे अहवाल पॉझिटीव्ह होते. हे अतिशय चिंताजनक आहे. शिवाय, १६ लाखांवर लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दररोज सरासरी अडीच हजारच चाचण्या होत आहेत. एकिकडे पॉझिटिव्हीटी रेट वाढत असताना चाचण्या कमी होणे म्हणजे संक्रमणाचा धोका वाढविणे होय. त्यामुळे ट्रेसिंग व टेस्टिंग वाढण्याची गरज आहे.

दरम्यान, अत्यवस्थ रुग्णांना प्राधान्याने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. यामुळे येथील भार वाढला असून, तज्ज्ञ डॉक्टर व प्रशिक्षित मनुष्यबळ अपुरे असल्याने रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाचे राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना या विषयाचे गांभिर्य लक्षात आणून दिले होते. तेव्हा आपणही उस्मानाबाद जिल्ह्याची ही अवस्था सुधारण्यासाठी तातडीने उस्मानाबादेत वरिष्ठ अधिकार्यांसह बैठक घेऊन नियोजनबद्ध उपाययोजना करुन द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे आ. पाटील यांनी केली आहे.

मराठवाड्यात उस्मानाबाद अव्वल...मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा विचार केला असता उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त २.४० टक्के मृत्युदर आहे. प्रति लाख लोकसंख्येमागे ६५ मृत्यू हाही दुर्दैवी उच्चांकी आकडा आहे. औरंगाबाद, नांदेड, लातूरसारखी मोठी शहरे याबाबतीत उस्मानाबादच्या खालीच आहेत. औरंगाबादेत प्रति १ लाख लोकसंख्येमागे ५९ तर लातूर, नांदेडमध्ये प्रत्येकी ५४ मृत्यू आहेत. नांदेड वगळता मराठवाड्यातील अन्य कोणत्याही जिल्ह्याचा मृत्यूदर १.६० पेक्षा जास्त नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajesh Topeराजेश टोपेOsmanabadउस्मानाबाद