तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, मे महिन्यात रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लसीकरणाकडे नागरिकांचा कलही वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी ४५ वर्षापुढील दोनशे नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला. त्यामध्ये सुभद्राबाई अंबादास शिंदे (वय ९८) यांनाही लसीकरण प्रमुख डॉ. श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारका पार्वती चव्हाण व आलीशिबा अडसूळे यांनी लस दिली. यावेळी महेंद्र कावरे, राजाभाऊ शिंदे व कासिम चौधरी उपस्थित होते. २१ मे पर्यंत तालुक्यात कोविडमुळे एकूण ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात उपजिल्हा रुग्णालयातील एकूण ४९ तर शहरातील दोन्ही खाजगी कोविड सेंटर मध्ये २० जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात काही ४० वर्षाखालील रुग्णांचा देखील समावेश असल्यने चिंतेचे वातावरण आहे.
दहा हजारावर नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:32 IST