शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

आज २० केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे ...

उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सजग नागरिक कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी पुढे येत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर ८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून दिली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिकांना पहिला व दुसरा डोस घेता येईल.

तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. मात्र, काेरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप पूर्णत: टळलेला नाही, शिवाय येत्या काही महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याचे भाकीत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्स, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे. सोबतच ग्रामीण, तसेच शहरी भागात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवारी १२ केंद्रांवर कोव्हॅक्सिन ८ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्रांवर १८ वर्षांपुढील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती, दिव्यांग यांना प्राधान्याने लस घेता येईल. ४५ वर्षांपुढील नागरिकांना ‘ऑन द स्पॉट’ लस मिळणार आहे.

या ठिकाणी मिळेल कोव्हॅक्सिन

लोहारा, सास्तूर, मुरुम, वाशी, भूम, तेर ग्रामीण रुग्णालय, तुळजापूर, उमरगा, परंडा, कळंब उपजिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्याल, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस मिळेल. पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झाले आहेत. अशा व्यक्तींनीच दुसरा डोस घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

येथे मिळणार काेविशिल्ड

उमरगा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, जिल्हा परिषद प्रशाला, कळंब येथील फुले, आंबेडकर वाचनालय, परंडा येथील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, लोहारा येथील भारतमाता मंदिर, वाशी येथील शिवशक्तीनगर परिसरातील जि.प.प्रा. शाळा, मुरुम येथील नूतन प्राथमिक शाळा, भूम येथील रवींद्र हायस्कूल या केंद्रावर कोविशिल्ड लस मिळेल. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांनी दुसरा डोस मिळेल.