शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

१७ गावांतून कोरोना हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST

लोहारा : तालुक्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी तालुकास्तरापासून गावस्तरापर्यंत प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. यामुळेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत ...

लोहारा : तालुक्यात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी तालुकास्तरापासून गावस्तरापर्यंत प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. यामुळेच कोरोनाच्या रुग्ण संख्येत आता कमालीची घट झाली असून, सद्यस्थितीत गावातून कोरोनाला हद्दपार करण्यात १७ गावांना यश आले आहे. याशिवाय २६ गावात बोटावर मोजण्याइतपत रुग्णसंख्या दिसून येत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेची सुरुवात तालुक्यातील धानुरी गावातून झाली होती. त्यामुळे ग्रामस्थांसह प्रशासनाचीही झोप उडाली. यानंतर हळूहळू सर्वच गावात कमी-अधिक प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. पहिल्या लाटेत रुग्ण संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही कमीच होते. परंतु, नागरिकांत मोठी भीती होती. हळूहळू या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्याने शासनाने लॉकडाऊन उठवून बाजारपेठ, मंदिरे खुली केली. यामुळे नागरिकही बिनधास्त राहिले. परंतु, मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेने तालुक्यात प्रवेश केला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या मोठी होती. शिवाय, मृत्यूचे प्रमाणही वाढले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोहारा, माकणी, जेवळी, कानेगाव, अचलेर, आष्टाकासार, नागूर, सास्तूर, एकोंडी (लो.), हिप्परगा, खेड, धानुरीसह अनेक गावे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले. यामुळे नागरिकांत प्रचंड भीती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत तालुका आरोग्य विभाग, लोहारा ग्रामीण रुग्णालय, सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाने अत्यंत प्रभावीपणे यंत्रणा राबवत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. पाहता पाहता आज तालुक्यातील १७ गावातून कोरोना पूर्णपणे हद्दपार झाला असून, २६ गावात बोटावर मोजण्याइतके रुग्ण आहेत. त्यामुळे ही गावेही लवकरच कोराेनामुक्त होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. सध्या लोहारा शहरासह एकोंडी (लो.), कानेगाव, धानुरी, जेवळी, सास्तूर व करवंजी या गावात दोन आकडी कोरोना रुग्ण संख्या असून, तालुक्यात सर्वाधिक ७९ कोरोना रुग्ण एकोंडी (लो.) गावात आहेत. चौकट..........

ही गावे झाली कोरोनामुक्त

लोहारा तालुक्यातील बेलवाडी, बेडकाळ, काटे चिंचोली, रेबे चिंचोली, दस्तापूर, फणेपूर, होळी, करजगाव, कास्ती (खुर्द), लोहारा (खुर्द), मोघा (बु.), मोघा (खुर्द), कोंडजीगड, राजेगाव, रुद्रवाडी, शिवकरवाडी आणि उंडरगाव ही १७ गावे सध्या कोरोनामुक्त आहेत.

६३ जणांचा मृत्यू

लोहारा तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ४०० कोरोना रुग्ण सापडले असून, यात शहरातील ५४९, तर ग्रामीण भागातील २ हजार ८५१ रुग्णांचा समावेश आहे. यातील शहरात १६, तर ग्रामीण भागात ४७ जणांचा या आजाराने मृत्यू झाला. सध्या शहरात २७, तर ग्रामीण भागात २४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तालुक्याचा मृत्यू दर हा १.८५ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२३ टक्के आहे.

यांचे योगदान मोलाचे

कोरोनाचा संसर्ग कमी करण्याच्या दृष्टीने तहसीलदार संतोष रुईकर, गटविकास अधिकारी सोपान अकेले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, लोहारा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. गोविंद साठे, सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे समन्वयक रमाकांत जोशी यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, कोविड सेंटरमधील डॉक्टर, नर्स, आरोग्यसेवक, सेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य कर्मचारी, वाहन चालक आदींनी वेळोवेळी घेतलेली मेहनत व लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यास मदत मिळत आहे.

कोट.......

नियमांचे काटेकोरपणे पालन, टेस्टिंग आणि लसीकरण या त्रिसूत्रीमुळे लोहारा तालुक्यातील एकूण १७ गावे आज कोरोनामुक्त झाली आहेत. उर्वरित गावेही कोरोनामुक्त होण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहेत. सर्वांनी नियम पाळूनच दैनंदिन व्यवहार करावेत, जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी तसेच लस घ्यावी व तालुक्याला कोरोनामुक्त करण्यास मदत करावी.

- डॉ. अशोक कटारे, तालुका आरोग्य अधिकारी