शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगणारी पालिका पाेलीस अधीक्षक कार्यालयावर मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उस्मानाबाद : काेराेनामुळे अडचणीत आलेल्या उस्मानाबाद पालिकेने यंदा थकीत कर वसुलीवर माेठ्या प्रमाणात भर दिला. टाॅप ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उस्मानाबाद : काेराेनामुळे अडचणीत आलेल्या उस्मानाबाद पालिकेने यंदा थकीत कर वसुलीवर माेठ्या प्रमाणात भर दिला. टाॅप - ५० थकबाकीदारांचे फलक तयार करून शहरातील वर्दळीच्या चाैकात लावले. या माध्यमातून थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगणारे पालिका प्रशासन पाेलीस अधीक्षक कार्यालयावर मात्र भलतेच मेहरबान झाले आहे. मालमत्ता तसेच पाणीपट्टीपाेटी असलेल्या तब्बल सव्वाकाेटी रूपये थकबाकीपैकी छदामही भरलेली नसताना या कार्यालयाचा पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे. त्यामुळे पाेटाला चिमटा घेऊन कर भरलेल्या करदात्यांमधून पालिकेच्या या दुटप्पी कार्यपद्धतीबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

काेराेनामुळे पालिकेच्या उत्पन्नात माेठी घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मुलभूत साेयी-सुविधा तसेच काेविडच्या अनुषंगाने करावयाच्या उपायाेजनांवर परिणाम हाेत असल्याचे सांगत पालिकेने कर वसुलीवर माेठा भर दिला. गल्लाेगल्ली भाेंगा फिरवून ‘कर भरा, अन्यथा कारवाईला सामाेरे जा’ अशा स्वरूपाची तंबीच नागरिकांना दिली. आपण कर न भरल्यास पालिकेच्या कारवाईला सामाेरे जावे लागेल, या भीतीपाेटी अनेक नागरिकांनी पाेटाला चिमटा घेऊन कराची रक्कम पालिकेच्या तिजाेरीत जमा केली. काहींनी तर उसनवारी, कर्जाऊ रक्कम काढून पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. दरम्यान, यानंतरही न जुमानलेल्या टाॅप - ५० थकबाकीदारांच्या नावाचे भलेमाेठे फ्लेक्स तयार करून पालिकेने ते शहरातील वर्दळीच्या ठिकाणी झळकवले. त्यावरील काही नावे पाहून अनेक लाेक ‘पालिकेने यांच्याकडून कर वसूल करून दाखवावाच’ असे आव्हान देत चालते हाेत हाेते. अब्रू वेशीवर टांगल्याचे पाहून यातील काहींनी लाजेखातर का हाेईना पालिकेच्या तिजाेरीत थकबाकीचे पैसे भरले. दरम्यान, थकबाकीदारांची अब्रू वेशीवर टांगणारे पालिका प्रशासन पाेलीस अधीक्षक कार्यालयावर मात्र भलतेच मेहरबान झाल्याचे समाेर आले आहे. या कार्यालयाचे मालमत्ता करापाेटी सुमारे ८० लाख तर पाणीपट्टीचे ४७ लाख रूपये थकीत आहेत. त्यामुळे पालिकेने कार्यालयाचा पाणीपुरवठा खंडित केला. मात्र, थकीत एक ते सव्वा काेटीपैकी पालिकेच्या तिजाेरीत छदामही जमा केलेली नसताना पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे, हे विशेष. दरम्यान, कर वसुलीच्या अनुषंगाने समाेर आलेल्या पालिकेच्या या दुटप्पी भूमिकेबाबत वेशीवर अब्रू टांगले थकबाकीदार व पाेटाला चिमटा घेऊन कर भरलेल्या नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

चाैकट...

गाेरगरिबांनी पाेटाला चिमटा घेऊन कर का भरायचा? - राजेनिंबाळकर

काेराेनामुळे पालिका आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे चालू व थकीत कर वसुलीवर भर देण्यात आला. कठाेर पाऊल उचलल्याशिवाय कर वसूल हाेणार नाही, हे लक्षात आल्यानंतर तशी पावले उचलली. त्यानुसार गाेरगरिबांनी माेलमजुरी करून पैसे पालिकेला भरले. हाच न्याय पाेलीस अधीक्षक कार्यालयालाही लावला हाेता. आठ वर्षांपासून त्यांच्याकडे काेट्यवधींचा कर थकीत आहे. यातील छदामही पालिकेच्या तिजाेरीत जमा झालेली नाही. तरीही मुख्याधिकारी यांनी काेराेना व ‘वरिष्ठां’च्या आदेशाचे कारण देत कारवाई मागे घेतली. हा अधिकार प्रशासनाला काेणी दिला? पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करणारे वरिष्ठ काेण? याची उत्तरे प्रशासनाने जनतेला द्यावीत, असे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी ‘लाेकमत’ला सांगितले.

पाेलीस अधीक्षक कार्यालयाकडे २ एप्रिल २०२१ अखेर थकीत मालमत्ता कर ८० लाख रूपये व थकीत पाणीपट्टी ४७ लाख रूपये आहे. वारंवार पत्रव्यवहार केला, मात्र कर भरला नाही. त्यामुळे पाणीपुरवठा ताेडला. मात्र, याबाबत आलेला वरिष्ठांचा आदेश आणि पाेलीस फ्रंटलाईन कर्मचारी असल्याने थकबाकी भरलेली नसतानाही पाणीपुरवठा पूर्ववत केला आहे.

- हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, उस्मानाबाद.