शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:39 IST

उमरगा : सततच्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील आर्द्रता व प्रदूषण याचा सर्वाधिक फटका अस्थमा रुग्णांना बसत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि ...

उमरगा : सततच्या ढगाळ वातावरणामुळे हवेतील आर्द्रता व प्रदूषण याचा सर्वाधिक फटका अस्थमा रुग्णांना बसत आहे. कोरोनाचा संसर्ग आणि इतर आजारांना निमंत्रण देणारे सध्याचे वातावरण आहे. विशेषत: अस्थमाच्या जुन्या रुग्णांना सध्या दम्याचा त्रास वाढत आहे. रुग्णालयात अशा रुग्णांची संख्याही वाढलेली दिसून येते. नियमित आहार, व्यायाम व औषधोपचारामुळे अस्थमा रुग्ण निरोगी जीवन जगू शकतात. हंगामी दमा हा ठरावीक कालावधीत (ऑगस्ट-सप्टेंबर) बळावू शकतो आणि उन्हाळ्यात रुग्ण एकदम नॉर्मल राहू शकतो. योग्य उपचार न मिळाल्याने दमा बळावतो, जुनाट होतो आणि हळूहळू श्वासनलिकांत कायमस्वरूपी बदल होऊ लागतात. मग, हा आजार दुर्धर आजारात रूपांतरित होतो, असे डॉक्टर सांगतात.

प्रतिकारशक्ती कमकुवत

श्वसनसंस्थेशी निगडित असलेल्या अस्थमा आजारामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अशा रुग्णांना इतर विषाणूंचा धोका असतो. अस्थमा रुग्णांना कोराेनाचा फारसा धोका संभवत नसल्याचे अलीकडच्या एका अभ्यासातून समोर आले असले, तरी या रुग्णांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

बालकही अस्थमाचे शिकार

अस्थमामुळे केवळ वयोवृद्धांना नाही, तर युवक व लहान मुलांनाही याचा त्रास होतो. लहान मुलांमध्ये अस्थमाचे प्रमाण फारसे नसले, तरी आनुवंशिकता व ॲलर्जीमुळे काही बालकांमध्ये अस्थमा दिसून येतो. बाल अस्थमा आपोआप नाहीसा होईलच हे सत्य नाही.

ही घ्या काळजी

अस्थमावर डाॅक्टरांनी दिलेले नियमित वापराचे औषध कुठल्याही परिस्थितीत बंद करू नका. औषध वेळेवर घेणे हा महत्त्वाचा उपाय आहे. ॲलर्जीकारक वस्तूंशी संपर्क टाळा. अनेकदा दम्याबरोबर ॲलर्जिक सर्दीसुद्धा सोबत असते. त्यासाठी नाकातील स्टेरॉइड स्प्रे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुरू करावा.

कोट.......

ढगाळ वातावरणात जुन्या अस्थमा रुग्णांच्या फुप्फुसात नळ्या आकुंचन पावल्यामुळे दम्याचा अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पंपाची औषधे नियमित घ्यावीत. जेणेकरून संभाव्य दमाचा अटॅक टाळता येऊ शकतो.

- डॉ. विजय बेडदुर्गे, दमा विकार तज्ज्ञ, उमरगा