उस्मानाबाद -काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे बहुतांश मुले घरामध्ये तासंतास टीव्ही, माेबाईल टॅबच्या स्क्रीनसमाेर असतात. जेवणही माेबाईल वा टीव्ही पाहातच करतात. त्यामुळे अतिरिक्त जेवण हाेते. फिजिकल ॲक्टिव्हीटीही बंद आहेत. परिणामी मुलांच्या वजनामध्ये वाढ झाल्याच्या बाबीस काही बालराेग तज्ज्ञांनी दुजाेरा दिला आहे.
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने शाळा बंद केल्या. साेबतच मैदानी खेळही बंद करण्यात आले. परिणामी मुले घरातच अडकून पडली. विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये, यासाठी शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन शिक्षणावर भर दिला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाईम अधिक वाढला. अनेक मुले तीन-तीन तास माेबाईलच्या क्रीनसमाेर राहू लागले. माेकळ्या वेळेतही बाहेर पडता येत नसल्याने टीव्ही पाहणे वा माेबाईलवर गेम खेळले जावू लागले. एकूणच मुलांची फिजिकल ’ॲक्टिव्हीटी’ बंद झाली. अनेक मुले माेबाईल वा टीव्ही पाहातच जेवणही करू लागली. परिणामी अतिरिक्त जेवण हाेत असल्याने लाॅकडाऊनच्या काळात अनेक मुलांचे वजण वाढले आहे. या अनुषंगाने काही बालराेग तज्ज्ञांना बाेलते केले असता, त्यांनीही या बाबीस दुजाेरा दिला.
चाैकट...
व्यायाम करून घ्यावा...
घरच्या घरी मुलांचा व्यायाम करून घेणे आवश्यक आहे. दाेरी खेळणे, सूर्यनमस्कार, याेगा, थाेडीफार सायकलींग करण्याकडेही मुलांचा कल वाढविणे गरजेचे आहे. प्राेटीनयुक्त आहार त्यांना देण्यात यावा. घरातील हलक्या, छाेट्या कामांमध्ये त्यांना व्यस्त ठेवावे. जेणेकरून माेबाईलचा वापर कमी हाेईल व चांगली सवयही लागेल.
मुलांना यापासून दूर ठेवा...
स्निग्ध, तेलकट, तळीव पदार्थ मुलांना आहारात देऊ नयेत. ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ काेणत्याही स्क्रीनपुढे मुलांना बसू देऊ नये. टीव्ही अथवा माेबाईल पाहत खाऊ घालू नये. मुलांची अधिकाधिक शारिरीक हालचाल हाेईल याकडे अधिक लक्ष द्यावे. लाॅकडाऊन असला तरी आपल्या घरातील व्यक्तीसाेबत मुलांना खेळते ठेवावे. कमीत कमी ४० मिनिटे व्यायाम असावा.
या कारणांमुळे वाढतेय मुलांचे वजन