शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

निजामकालीन इमारतीत पोलीस ठाण्याचा कारभार

By admin | Updated: June 1, 2017 00:41 IST

शिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पोलीस स्टेशन निजाम काळात १९२० मध्ये पत्र्याचे छत असलेल्या इमारतीमध्ये कामकाज चालते.

राहूल ओमने। लोकमत न्यूज नेटवर्कशिराढोण : कळंब तालुक्यातील शिराढोण येथील पोलीस स्टेशन निजाम काळात १९२० मध्ये पत्र्याचे छत असलेल्या इमारतीमध्ये कामकाज चालते. पावसाळ्यात छताला गळती लागते. उपलब्ध निवास्थानांचीही दुरवस्था झाली असून, याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. कळंब तालुक्यातील ९३ गावांपैकी शिराढोणमध्ये पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४० गावे व १२ वस्त्या आणि पारधी पिढ्या आहेत. उर्वरित ५३ गावांमध्ये कळंब आणि येरमाळा अशा दोन पोलीस ठाण्यांचे कार्यक्षेत्र आहे. यामुळे कळंब तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेले पोलीस स्टेशन म्हणून शिराढोण पोलीस स्टेशनची ओळख आहे. या ठाण्याची इमारत १९२० मध्ये निजामकाळातील दगडी बांधकामाची आहे. इमारतीचे दगडी बांधकाम मजबूत असले तरी छतावर पत्रे असल्याने पावसाळ्यात याला गळती लागते.शिवाय इमारत अपुरी असल्याने कर्मचाऱ्यांना दैनंदिन कामकाज करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. ९७ वर्षांपूर्वीच्या कोठडीमध्ये आरोपींना ठेवण्यात येते. ही जागा अतिशय कमी असल्याने दहापेक्षा अधिक आरोपींना ठेवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. शिराढोण पोलिसांच्या निवासस्थानाचे बांधकाम करून जवळपास तीन दशकाच्या वर कालावधी लोटला. हे बांधकाम कौलारू पद्धतीचे असून, याचीही दुरवस्था झाली आहे. अधिकारी व पोलिसांची संख्या ४७ झाली असून, निवास्थान मात्र १५ ते २० कर्मचाऱ्यांपुरतेच आहेत. पोलिसांनी मुख्यालयी राहण्याची सक्ती असल्याने त्यांना खाजगी जागेत रहावे लागत आहे. त्यामुळे येथे नवीन वाढीव निवासस्थान बांधण्याची मागणी होत आहे.प्रस्ताव पाठविला शिराढोण पोलीस स्टेशनमध्ये सध्या महिला कक्षाचे बांधकाम सुरू आहे. नवीन इमारतीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असून, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता पाटील यांनी सांगितले.