भूम : तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे सुनील जाधव तर उपसरपंचपदी आरती नलवडे यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आष्टा ग्रामविकास आघाडीने नऊ जागा ताब्यात घेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला. सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश सातपुते यांच्या उपस्थितीत सरपंच, उपसरपंच निवडीसाठी बैठक पार पडली. यावेळी सरपंचपदासाठी सुनील जाधव व उपसरपंचपदासाठी आरती नलावडे यांचेच अर्ज आल्याने, बिनविरोध निवडी झाल्याचे जाहीर करण्यात आले. निवडीनंतर नूतन सरपंच व उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी नूतन सदस्यांसह माजी उपसरपंच तानाजी गिलबिले, विठ्ठल काकडे, संभाजी गिलबिले, प्रदीप काकडे, राजकुमार घरत, जयराम गिलबिले, सचिन गिलबिले, हभप सतीश कदम महाराज, किरण गिलबिले, प्रदीप गिलबिले, मयूर कवडे, अमर गिलबिले, प्रशांत गिलबिले, सुनील गिलबिले, धनंजय पाटील, मनोज डिसले, राजाभाऊ कदम आदी उपस्थित होते.