शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानफाेडीतील चाैघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

उस्मानाबाद : शहरातील माणिक चाैकातील दुकानफाेडीच्या घटनेतील चाैघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठाेकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दाेन ...

उस्मानाबाद : शहरातील माणिक चाैकातील दुकानफाेडीच्या घटनेतील चाैघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठाेकल्या. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दाेन दुचाकींसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद शहरातील माणिक चाैकातील दुकानफाेडीची घटना ११ जानेवारीच्या मध्यरात्री घडली हाेती. या घटनेत अज्ञात चाेरट्यांनी विविध कंपन्यांचे तयार कपडे, सदरे-विजारी, संगीत उपकरणे, असा एकूण ३९ हजार ७५० रुपयांचा ऐवज चाेरून नेला हाेता. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर आनंदनगर पाेलीस ठाण्यात भा.दं.सं.चे कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंद झाला हाेता. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही छायाचित्रणावरून तपासाची चक्रे फिरविली. या माध्यमातून हाती लागलेल्या माहितीच्या आधारे पथकाने मनीष भेंडेगावे ऊर्फ महाबळेश्वर (रा. काकानगर), आतीश शिंदे (रा. शिंगाेली) यांच्यासह दाेन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गुन्ह्यात वापरलेल्या दाेन दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कार्यवाहीसाठी संबंधितांना आनंदनगर पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पाेनि. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपाेनि. निलंगेकर, पाेना. कावरे, पाेकाॅ. अशाेक ढगारे, दीपक लाव्हरे-पाटील, पाेकाॅ. साेनवणे यांच्या पथकाने केली.