परंडा : नगर परिषदेकडून मालमत्ता करामध्ये मोठी वाढ प्रस्तावित केलेली असतानाच आता विविध प्रमाणपत्र आणि व्यवसाय परवाना शुल्कामध्येही वाढ केली आहे. याचा फटका व्यवसायिकांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही बसणार आहे. नगर परिषदेकडून २०१५-१६ ते २००१८-१९ या चार वर्षाकरिता प्रस्तावित करवाढीच्या नोटिसा नागरिकांना देण्यात आल्या आहेत. सदरील करवाढ ही अन्यायकारक असल्याची ओरड जनतेतून होत असतानाच आता विविध प्रमाणपत्रांच्या शुल्कामाध्ये १ एप्रिलपासून वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवसायिक व नागरिकांना याचा फटका सोसावा लागणार आहे. व्यवसाय परवाना, रहिवाशी प्रमाणपत्र, ना हरकत, जन्म-मृत्यू प्रमाणप, नळ कनेक्शन, मालमत्ता नोंद, नक्कल शुल्क, विवाह नोंदणी, बेबाकी प्रमाणपत्र अशा विवध प्रमाणपत्रांच्या शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सर्व घटकातील नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
नगर पालिकेकडून प्रमाणपत्र शुल्क वाढ
By admin | Updated: April 8, 2015 00:50 IST