शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे जंतनाशक गाेळ्या वाटप ठप्प, बालकांमध्ये जंतदाेष बळावला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:37 IST

उस्मानाबाद : मागील दाेन वर्षांपासून काेराेना पाठ साेडण्याचे नाव घेत नाही. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी धाेका ...

उस्मानाबाद : मागील दाेन वर्षांपासून काेराेना पाठ साेडण्याचे नाव घेत नाही. सध्या काेराेनाचा संसर्ग कमी झाला असला, तरी धाेका टळलेला नाही. या संकटाचा फटका अंगणवाडी, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या जंतनाशक गाेळ्या वाटप माेहिमेस बसला आहे. दर सहा महिन्यांनी घेण्यात येणारी माेहीम वर्षभरापासून झालेली नाही. परिणामी, बालकांतील जंतदाेष बळावल्याचे आराेग्य विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले. उघड्यावर शाैचास जाणे, हात स्वच्छ न धुण्यात आल्याने खासकरून बालकांमध्ये जंतदाेष आढळून येताे. वेळीच उपचार न केल्यास पुढे रक्तक्षय, अपचन, संडास, उलटीची त्रास हाेताे. यातून कुपाेषण डाेके वर काढते. परिणामी, मुलांची एकाग्रता कमी हाेते. त्यामुळे हा आजारच हाेऊ नये, म्हणून आराेग्य विभागाच्या वतीने शाळा, तसेच अंगणवाडीतील बालकांना जंतनाशक गाेळ्या दिल्या जातात. दर सहा महिन्यांनी ही माेहीम घेणे बंधनकारक आहे, परंतु काेराेनामुळे वर्षभराचा कालावधी लाेटूनही माेहीम झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बालकांमध्ये जंतदाेष बळावला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

काय आहे जंतदाेष?

जंतदाेष हा सर्वसाधारण आजार वाटत असला, तरी त्याच्यावर वेळीच उपचार न केल्यास पुढे बालकांना गंभीर दुष्परिणामांचा सामना करावा लागताे. अनेक वेळा संबंधित बालक कुपाेषणाच्या विळख्यात सापडते. त्यामुळे वेळीच उपचाराची गरज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

२१ सप्टेंबर पासून माेहीम...

जागतिक आराेग्य संघटनेच्या सूचनेनुसार, जिल्ह्यात जंतनाशक गाेळ्या वाटप माेहीम २१ ते २८ सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासाठी १ ते ६, ६ ते १० आणि १० ते १९ असे तीन वयाेगट तयार करण्यात आले आहेत. उपराेक्त वयाेगटातील मुलांना आराेग्य कर्मचारी, शिक्षक व आशा कार्यकर्तींच्या माध्यमातून गाेळ्या दिल्या जातील.

गाेळ्यांसाठी काेणाकडे संपर्क करावा?

एकही बालक गाेळ्यांपासून वंचित राहू नये, यासाठी आराेग्य विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे गाेळ्यांसाठी पालकांनी वा नातेवाइकांनी गावातील शाळेवरील शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी अथवा आराेग्य कर्मचाऱ्यांशी संपर्क केल्यास गाेळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

काेट...

जागतिक आराेग्य संघटनेच्या अंदाजानुसार, २८ टक्के बालकांमध्ये जंतदाेष असताे. हा दाेष नाहिसा करण्यासाठीच जंतनाशक गाेळ्या वाटपाची माेहीम राबविण्यात येते. आपल्याकडे २१ सप्टेंबरपासून ही माेहीम सुरू हाेईल. त्याचे नियाेजन करण्यात आले आहे.

-डाॅ.कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आराेग्य अधिकारी.

स्वच्छतागृहाचा हवा नियमित वापर

बालकांमध्ये जंतदाेष बळावण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. यापैकी प्रमुख कारण म्हणजे, उघड्यावर शाैचास जाणे. आजही ग्रामीण भागात शाैचालयाची बांधकामे झाली असली, तरी त्याचा १०० टक्के वापर हाेत नाही. त्यामुळे प्रामुख्याने जंतदाेष निर्माण हाेताे. जंतदाेष टाळण्यासाठी वेळाेवेळी हात स्वच्छ धुतला पाहिजे, परंतु बाहेर पडल्यानंतर तशी साेय नसते. यातूनही जंतदाेष बळावण्याचा धाेका अधिक असताे.