शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

धानुरीत पुन्हा घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST

धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथे १५ दिवसापूर्वीच सात घरे फोडल्याची घटना घडली होती. पाठोपाठ पुन्हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास ...

धानुरी : लोहारा तालुक्यातील धानुरी येथे १५ दिवसापूर्वीच सात घरे फोडल्याची घटना घडली होती. पाठोपाठ पुन्हा मंगळवारी पहाटेच्या सुमारास चार घरे व अंगणवाडीत चोरट्यांनी हात साफ केला. यावेळी चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रकमेसह एक दुचाकीही चोरून नेली. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी गावातील जयहिंद पाटील यांचे घर फोडून कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले साडेतीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. तसेच गणेश ज्ञानोबा यादव हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले असल्याने घरात कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश मिळविला. या ठिकाणाहून कपाटात ठेवलेले अडीच तोळे सोन्याचे दागिने व रोख ५ हजार रुपये लंपास केले. गावातीलच अंगणवाडी क्रमांक ३ चे कुलूप तोडून चोरट्यांनी येथूनही अंदाजे २० हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही चोरून नेला. मेघराज पाटील यांनी आठ दिवसापूर्वीच दुचाकी विकत घेतली होती. नेहमीप्रमाणे त्यांनी ती दुचाकी घरासमोर लावून झोपी गेले होते. चोरट्यांनी जाता जाता ही दुचाकीही लंपास केली.

या घटनेची माहिती नागरिकांनी व पोलीस पाटलांनी लोहारा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आनंदराव वाठोरे, पोलीस कर्मचारी इंगळे, गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

चौकट......

ऐवज न मिळाल्याने केली दारूची पार्टी

चोरट्यांनी गावातील राम पाटील यांचेही घर फोडले. मात्र येथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे चोरट्यांनी त्यांच्या घरात बसून देशी दारू पिऊन रिकाम्या बाटल्या घरात टाकल्या. त्यानंतर गावातीलच तानाजी अंबुरे यांचे घर फोडण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केला. परंतु, आवाज ऐकून घरातील सर्व सदस्य जागे झाल्याने व आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला.