शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मोहेकर इंडस्ट्रीजचे बॉयलर प्रदीपन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST

अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे दिलीप धोत्रे, उद्योजक प्रशांत चेडे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, ...

अध्यक्षस्थानी आमदार कैलास पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे दिलीप धोत्रे, उद्योजक प्रशांत चेडे, शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी कापसे, ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर आदी उपस्थित होते. यावेळी मोहेकर ॲग्रोचे चेअरमन हनुमंत मडके, दहीफळचे सरपंच चरणेश्वर पाटील, मोहाचे सरपंच राजू झोरी, ढोकीचे सरपंच अमोल समुद्रे, उपसरपंच सोमनाथ मडके, लातूर मल्टिस्टेटचे चेअरमन सगरे, मोहेकर मल्टिस्टेटचे कार्यकारी संचालक विशाल मडके, ॲग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके आदी उपस्थित होते.

प्रारंभी मोहेकर मल्टिस्टेट व मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज कर्मचाऱ्यांसाठी उभारलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बॉयलर पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी ज्ञानप्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंतांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी हणमंत मडके यांनी, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याची उभारणी केली असून, ॲग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून उसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तसेच ‘ज्यूस टू इथेनॉल’ प्रोजेक्ट राबविला जाणार असल्याचे सांगितले.

सूत्रसंचालन भारत जोशी यांनी केले, तर आभार कार्यकारी संचालक संतोष मडके यांनी मानले.

चौकट......

कर्मचाऱ्यांना सोन्याची अंगठी

मोहेकर मल्टिस्टेटचे चेअरमन हनुमंत मडके व मार्गदर्शक डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या संकल्पनेतून, संस्थेमधून उत्कृष्ट कर्मचाऱ्यांची निवड केली जाते. यंदा मल्टिस्टेट स्थापनेपासूनच बरोबर असलेले व्यवस्थापक फुलचंद मडके यांचा शाल, श्रीफळ व दहा ग्रॅम सोन्याची अंगठी घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट तथा मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजकडून ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांना ‘मोहा भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नुकत्याच स्थापन झालेल्या मोहा पत्रकार संघाकडून संस्थेचे चेअरमन हनुमंत मडके यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.