राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष खा. शरद पवार, महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून राज्यातील गरजूंना उपलब्ध करून द्यावे, यासाठी येथील नगर परिषद वाचनालय येथे हे शिबिर घेण्यात आले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा. डॉ. संजय नवले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, जिल्हासचिव राजाभाऊ भिसे, कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, प्रा. शिवाजी लकडे, प्रदेश सदस्य प्रा. डॉ. संजय कांबळे, पं. स. उपसभापती गुणवंत पवार, नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, प्रभारी उपनगराध्यक्ष अमर गायकवाड, सागर मुंडे, सुभाष घोडके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पद्माकर पाटील, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के, शहराध्यक्ष मुत्सदिक काझी, उपशहराध्यक्ष बाळासाहेब कथले, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार पवार, उमेश मडके, औदुंबर धोंगडे, सुहास बारकुल, विठ्ठल कोकाटे, समाधान बाराते, शहराध्यक्ष रणजित खोसे, अजय जाधव, राहुल कसबे, पालिका गटनेते लक्ष्मण कापसे, महिला अध्यक्ष रुकसाना बागवान, अल्पसंख्याक विभाग तालुकाध्यक्ष सलमा सौदागर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे, अतुल धुमाळ, अविनाश घोडके, स्वप्निल चिलवंत, सौरभ मुंडे, महेश पुरी, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब आडसूळ, संतोष पवार, ऋषिकेश देशमुख, आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या शिबिरात ५४ दात्यांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:29 IST