भंडारवाडी येथे दारु अड्ड्यावर धाड
उस्मानाबाद : तालुक्यातील भंडारवाडी येथील एका दारु अड्ड्यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने ७ फेब्रुवारी रोजी धाड टाकली. यात भंडारवाडी येथील बाळासाहेब गायकवाड यांच्याजवळ देशी दारुच्या १३ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी मद्य जप्त करुन संबंधिताविरुद्ध गुन्हा नोंद केला.
६०७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६०७ वाहनचालकांवर मोटारवाहन कायद्यांतर्गत पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाया १८ पोलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने जिल्ह्यातील विविध मार्गावर करण्यात आल्या. या वाहनचालकांकडून १ लाख २५ हजार ७०० रुपयाचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाया केल्या जाणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.
कोरेगावातून पाणबुडी विद्युत पंप चोरला
उस्मानाबाद : शेळ्यावर बसविण्यात आलेला पाणबुडी विद्युत पंप अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उमरगा तालुक्यातील कोरेगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी घडली.
कोरेगाव येथे राजाराम बिराजदार यांनी कोरगाव तळ्यावर ५ अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप बसविला होता. हा पंप अज्ञात चोरट्यांनी ७ फेब्रुवारी रोजी चोरुन नेला. बिराजदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चाेरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.