शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात सापांपासून सावधान...! उस्मानाबाद जिल्ह्यात विषारी सापांच्या केवळ चार प्रजाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:43 IST

नाग (नागराज) : जो फणा काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग ...

नाग (नागराज) : जो फणा काढून उभा राहतो तो नाग, जोरात फुत्कार, फुस्स असा सारखा आवाज आल्यास जवळ नाग आहे असे समजावे.

मण्यार : काळपट नीळसर रंग, अंगावर पांढरे पट्टे, शेपटीकडे अधिक डोक्‍याकडे कमी होत जातात हा साप इतर सापांना खातो.

फुरसे : फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टीसारखे नक्षीकाम, डोक्‍यावर बाणासारखी खूण, दंश करताना जिलेबीसारखा आकार करून शरीर एकमेकावर घासतो आणि करवतीसारखा करकर आवाज करतो.

घोणस : हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके असणाऱ्या रेषा असतात, डोक्‍यावर इंग्रजी व्ही अक्षर असते.

जिल्ह्यात आढळणारे विनविषारी साप

जिल्ह्यात केवळ चार साप विषारी आढळून येतात. तर मांजऱ्या व हरणटोळ हे दोन साप निम्नविषारी आहेत. धामण, कड्या, तस्कर, गवत्या, पांदीवड, नानीटी हे साप बिनविषारी आहेत. मात्र, नागरिक साप म्हटले की सर्वच साप विषारी समजून त्यांना इजा पोहोचवित असतात. साप हे जीवसृष्टीतील महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.

साप आढळला तर

शेतात तसेच रस्त्याला साप आढळून आला तर नागरिकांनी त्यास इजा न पोहोचविता जाऊ द्यावे.

घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून ५ ते ६ फूट अंतर राखून उभे राहावे.

घोणस जातीच्या सापाला डिवचल्यानंतर तो मानवावर हल्ला करू शकतो.

घराच्या परिसरात नाग आढळून आला तर ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे.

साप चावला तर

चार विषारी व दोन निम्नविषारी साप आहेत. हे साप चावले तर नागरिकांनी प्रथाेमपचार न करता थेट नजीकच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. नागरिकांना कोणता साप विषारी व कोणता बिनविषारी साप आहे. याबाबत माहिती नसते. त्यामुळे जागा घट्ट बांधणेही चुकीचे ठरू शकते. तसेच साप चावल्यानंतर नागरिकांचा भीती पोटीच मृत्यू होता. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालय गाठणे सोयीचे ठरते.

कोट...

साप तिन्ही ऋतूत आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चार विषारी प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच मानवी वस्तीत साप आढळून आल्यानंतर त्यास इजा न पोहोचविता सर्पमित्रांशी संपर्क साधावा.

अक्षय माने, सर्पमित्र