शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांचे पाईक बना, बुद्ध विचारांचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

उमरगा : आपण बुद्धांचे पाईक आहोत. बुद्धांच्या विचाराचे आचरण करणे गरजेचे आहे. स्वतःला सिद्ध करा. स्वतःच्या हिंमतीवर जगा. सरकारच्या ...

उमरगा : आपण बुद्धांचे पाईक आहोत. बुद्धांच्या विचाराचे आचरण करणे गरजेचे आहे. स्वतःला सिद्ध करा. स्वतःच्या हिंमतीवर जगा. सरकारच्या कित्येक योजना दलितांसाठी हितकारक असून, या योजनेचा लाभ घेऊन स्वावलबी बना. कोरोना काळात पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोठे काम केले आहे. त्यांचा आदर करा, असे आवाहन केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी केले.

उमरगा तालुक्यातील कराळी येथील बुद्ध विहार परिसरातील सभागृहाचे उद्घाटन, डांबरी रस्त्याचा लोकार्पण सोहळा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी जि. प. अध्यक्ष अस्मिता कांबळे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे, समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, माजी जि. प. सदस्य दिलीप भालेराव, जि. प. चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हळ, राजाभाऊ सरवदे, माजी आमदार दयानंद गायकवाड, रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, विलास खिल्लारे, मच्छिंद्र सरपे, चंद्रकांता सोनकांबळे, धनंजय शिंगाडे, राम गायकवाड आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, सर्वांनी धम्माचा आदर करावा. मनातला अहंकार दूर करावा. बाबासाहेबांनी दिलेल्या बुद्ध धम्माला तळहातावरच्या फोडागत सांभाळा. गट-तट असले तरी तेही आपलेच मानून त्यांना सोबत घेऊन चला. सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे करा. कार्यकर्ते तयार करा. मी आलो म्हणून गर्दी करू नका. गर्दीचे मतदानात रूपांतर करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कराळी बुद्ध विहाराच्या उर्वरित कामासाठी दुसरा निधी लवकरच देऊ, असे आश्वासन देऊन बुद्ध विहार कामाचे त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमासाठी उस्मानाबाद, लातूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुधीर कांबळे यांनी केले. विलास खिल्लारे यांनी प्रास्ताविक, तर मच्छिंद्र सरपे यांनी आभार मानले.