शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोहारा तहसीलवर ‘प्रहार’चा बैलगाडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 18:42 IST

उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

लोहारा (उस्मानाबाद )  : उस्मानाबाद जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून आज लोहारा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पावसाअभावी खरीप हंगाम हातचा गेला आहे. असे असतानाही खरीप पिकाची आणेवारी ६० पैसे पेक्षा अधिक असल्याचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. हा अहवाल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे प्रशासनाने नव्याने वस्तुनिष्ठ पैसेवारी जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत द्यावी, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे आदी मागण्यांसाठी मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्षाकडून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

शहरातील मुख्य मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. परंतु, मागण्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कोणीही अधिकारी कार्यालयाच्या बाहेर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर घोषणाबाजी करीत कार्यकर्ते तहसीलमध्ये घुसले. मरत्र, कार्यालयातही तहसीलदार अथवा नायब तहसीलदार कोणीच हजर नव्हते. त्यामुळे ‘प्रहार’च्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांच्या रिकाम्या खुर्चिला हार घालून निवेदन देण्याचा निर्णय घेतला असता, काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर अव्वल कारकुन बालाजी चामे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी आण्णासाहेब दराडे, अ‍ॅड. जयपाल पाटील, मनोज जाधव, महमंद आत्तार, दत्ता झिंगाडे, वामन मुळे, बालाजी बनसोडे, जिंदावली मोमिन, किसन कुलकर्णी, उमरआली शेख, जुबेद शेख, शमशोद्दीन शेख, हैदर शेख, रमेश नागरगोजे, कालीदास घुगे, जयपाल पाटील, उमेश गवळी, महादेव जाधवर, फारुक शेख आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Osmanabadउस्मानाबादdroughtदुष्काळMorchaमोर्चा