शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

बहुजन महामोर्चाची जय्यत तयारी

By admin | Updated: January 14, 2017 00:18 IST

उस्मानाबाद : बहुजन समाजातील विविध जाती-जमाती, संघटनांच्या वतीने येत्या १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले

उस्मानाबाद : बहुजन समाजातील विविध जाती-जमाती, संघटनांच्या वतीने येत्या १७ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहुजन मूक महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, संयोजन समितीच्या वतीने या मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चात विविध ६० जाती-जमातींचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती बहुजन न्याय हक्क अधिकार संरक्षण समितीच्या वतीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.ओबीसी समाजास सर्व क्षेत्रात ५२ टक्के आरक्षणाची तरतूद करावी, तसेच त्यानुसार राज्य आणि केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात निधी नियोजित करावा, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कठोर अंमलबजावणी करून दोषींची संपत्ती जप्त करावी, महिलांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, कष्टकरी बहुजनांची सर्व प्रकारची कर्जे माफ करावी, बहुजन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी, बहुजनांच्या आरक्षणात घुसखोरी बंद करावी, लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी, सच्चर कमिटीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, शेती, विमा, खाजगी शैक्षणिक संस्था, कंपन्या, तसेच बेकायदेशीर संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करावे, वडार समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करावा, सोनार व्यावसायिकांना प्रशासनाकडून होणारा त्रास बंद करावा, बहुजनांची जातनिहाय जनगणना करावी, दारू, जुगारासह अवैध व्यवसाय कायमस्वरुपी बंद करावे, बाबू जगजीवनराम आयोगाची स्थापना करावी, आदिवासी पारधी समाजाची नोकरभरती सरळसेवा एकाच वेळी करावी, धनगर समाजाचा एसटी प्रवर्ग अंमलबजावणी व्हावी, अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकात जीवा महाले, शिवा काशीद यांच्यासह मावळे सरदारांचेही स्मारक उभारावे, तंटामुक्त समिती तसेच ग्रामसभाची पद्धत बंद करावी, बहुजन वस्त्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी कलमान्वये कार्यवाही करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.सुमारे ५५ ते ६० जाती, जमातींच्या प्रतिनिधींनी मोर्चात सहभाग नोंदविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध जाती, जमाती एकत्र येत आहेत. ही बाब आमच्यासाठी सर्वात महत्वाची असल्याचे सांगत, येणाऱ्या दिवसात आणखी काहीजण यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बहुजन मूक मोर्चाच्या वतीने देण्यात येणाऱ्या निवेदनातील मागण्याही वाढतील, असे यावेळी सांगण्यात आले. शहरातील जत्रा फंक्शन हॉल येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, माजी नगरसेवक धनंजय शिंगाडे, माजी जि.प. सदस्य भारत डोलारे यांच्यासह मुकेश नायगावकर, सुनील काळे, संजय वाघमारे पांडुरंग लाटे, सतीश कसबे, दादासाहेब जेटिथोर, अमोल पेठे, रवी कोरे-आळणीकर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)