शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अस्ताव्यस्त नालीमुळे बसस्थानकाची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

कळंब : रस्त्याच्या कामाने नालीचा प्रवाह बंद केल्यामुळे थोड्याशा पावसाने बसस्थानक आवारात पाण्याची डबकी साचत असून, याचा प्रवाशांसह स्थानक ...

कळंब : रस्त्याच्या कामाने नालीचा प्रवाह बंद केल्यामुळे थोड्याशा पावसाने बसस्थानक आवारात पाण्याची डबकी साचत असून, याचा प्रवाशांसह स्थानक परिसरातील व्यावसायिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात संबंधितानी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे

कोरोनामुळे अनेक महिने निर्मनुष्य असलेल्या कळंब बसस्थानक परिसरात सध्या प्रवाशांची चांगलीच वर्दळ दिसून येत आहे. जागेवर ठप्प असलेल्या लालपरीची चाके धावू लागल्याने कळंब आगारात हजारो प्रवाशांची दररोज ये-जा चालू असते. यामुळे कर्मचारी, स्थानक आवारातील व्यावसायिक यांच्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. एकीकडे असे सुखद चित्र असतानाच दुसरीकडे मात्र यंदा स्थानक व आगाराचे ‘एंट्री पॉईंट’ असलेल्या उजव्या बाजूस थोड्याशा पावसाने चिखलमय पाण्याची डबकी साचत आहेत. पाण्याच्या डोहातून दुर्गंधी पसरत आहे. यामुळे स्थानक आवारात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना याचा त्रास तर सहन करावा लागत आहेच, शिवाय परिसरातील व्यावसायिक त्रासून गेले आहेत. असे असताना ही नाली प्रवाही करण्याचे, पाण्याचे डोह कमी करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? याचे कोडे उलगडत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

चौकट...

राष्ट्रवादी काँग्रेसची आग्रही मागणी

दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांची भेट घेऊन संबंधित एजन्सीला नाली ब्लॉक झाल्याने पाणी स्थानक आवारात येऊ नये यासंबंधी सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. यावेळी पं. स. उपसभापती गुणवंत पवार, तालुका उपाध्यक्ष रमेश देशमुख, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुशील शेळके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमराव हगारे, राष्ट्रवादी युवकचे सचिव मनोज शिदे, सौरभ मुंडे, रोहन देशमुख, आदी उपस्थित होते.

ठेकेदाराची बेफिकिरी

कळंब बसस्थानकाच्या समोरील भागातून खामगाव-पंढरपूर महामार्ग जातो. याचे काम कायम ‘प्रगतिपथावर’ असते. हे काम करत असताना स्थानकासमोरच्या मोठ्या नालीला अडथळा झाला आहे. यामुळे मोठ्या नालीचे पाणी तटून ते स्थानक आवारात घुसत आहे. यामुळेच कळंब बसस्थानकाची दैना झाली असल्याचे स्थानिक व्यावसायिक सांगत आहेत. यासंदर्भात फेब्रुवारी व जुलै महिन्यांत दोनवेळा पत्र देऊन संबंधितांना अवगत केले आहे, असे आगार प्रमुख मुकेश कोमटवार यांनी सांगितले.