समुद्रवाणी : कोविड महामारीच्या अनुषंगाने सर्व शासकीय नियमांचे पालन करीत शिवजयंती उत्सव मिरवणूक व मोटारसायकल रॅलीशिवाय साजरा करावा, असे आवाहन बेंबळी पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि मछिंद्रनाथ शेंडगे यांनी केले.
बेंबळी हद्दीतील गावातील शिवजयंती उत्सव समित्यांचे पदाधिकारी व पोलीस पाटलांच्या बैठकीत ते बोलत होते. शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी कामे करावीत, रक्तदान शिबिराचे आयोजन करावे. प्रतिमेचे पूजन जागेवरच करून १०० पेक्षा जास्त जमाव जमणार नाही, याची काळजी घ्यावी. मास्कचा व सॅनिटायझरचा वापर करावा, अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
यावेळी बेंबळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक भागवत गाडे, जिल्हा विशेष शाखेचे हेकॉं रियाज पटेल यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. बेंबळी हद्दीतील ४७ गावातील शिवजयंती उत्सवाचे पदाधिकारी व पोलीस पाटील उपस्थित होते.