शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नंदगावातील आराे प्लांट धूळखात, साडेपाच लाखांचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:37 IST

नंदगाव : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लांट बसविले; परंतु चार ...

नंदगाव : तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लांट बसविले; परंतु चार वर्षांच्या काळात ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळाले नाही. त्यामुळे सध्या दाेन्ही प्लांट अक्षरश: धूळखात पडून आहेत. याअनुषंगाने आता ग्रामस्थांतून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे शासकीय निधीतून ऑगस्ट-सप्टेंबर २०१७ मध्ये प्रत्येकी २ लाख ७५ हजार रुपये याप्रमाणे साडेपाच लाख खर्च करून दाेन आरओ प्लांट उभारले. ग्रामस्थांना शुद्ध पाणी माफक दरात मिळावे, हा या मागचा उद्देश; परंतु दाेन्ही प्लांट मागील चार वर्षांपासून पत्र्याच्या शेडमध्ये धूळखात पडून आहेत. आजवर ग्रामस्थांना घाेटभरही शुद्ध पाणी मिळालेले नाही. हा मुद्दा सरपंच सरस्वती कलशेट्टी यांच्याकडे उपस्थित केला असता, ‘आपण सत्तेत येण्यापूर्वीच ही याेजना राबविण्यात आलेली आहे. त्यामुळे याेजनेद्वारे ग्रामस्थांना पाणी का पुरविले जात नाही, याचे कारण माझ्याकडे नाही. असे असले तरी काही दिवसांपूर्वीच सदरील याेजना कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने ग्रामसेवकांना सूचना केली हाेती. मात्र, त्यांनी आजवर आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे तूर्तास हा प्लांट बंदच आहे. दरम्यान, ग्रामसेवक रमेश धड्डे यांच्याकडे विचारणा केली असता, आरओ प्लांट सुरू केल्यानंतर त्याचे वेस्टेज पाणी काेठे साेडायचे, हा प्रश्न आहे आणि आमच्याकडे कर्मचारीही नाहीत. एवढेच नाही तर काेणी चालवायलाही घेत नाहीत,’ असे सांगितले.

चाैकट...

सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून आरओ प्लांट बसविण्यात आले; परंतु सुरू करण्याचे काेणी नाव घेत नाही. सुरूच करायचे नव्हते, तर प्लांट बसविले कशासाठी? ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नाही.

-प्रदीप वाघमारे, ग्रामस्थ, नंदगाव

आरओ प्लांट बसविल्यानंतर ते कार्यान्वित करणे गरजेचे आहे; परंतु संबंधित मंडळी काम करून माेकळी झाली. ग्रामस्थांना पाणी मिळाे की न मिळाे, याची त्यांनी काळजी केली नाही. विद्यमान सरपंच, सदस्यांनी तरी याबाबतीत पुढाकार घेणे गरजेचे आहे.

-सुरेश जमादार, ग्रामस्थ, नंदगाव