शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मुजीब पठाण यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST

ढोकी : रिपब्लिकन सेनेच्या परभणी येथे पार पडलेल्या बैठकीत येथील मुजीब पठाण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

ढोकी : रिपब्लिकन सेनेच्या परभणी येथे पार पडलेल्या बैठकीत येथील मुजीब पठाण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोहर डबरासे, प्रदेश महासचिव प्रा. युवराज धासवाडीकर, प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण घोंगडे, योगेंद्र चौरे आदी उपस्थित होते.

शेतकरी त्रस्त

पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात यंदा परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे रबी हंगामातील पिकांची वाढ चांगली आहे; परंतु ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे ज्वारीसारख्या पिकात फवारणीसह पावडर टाकताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असून, चिकटा मावा रोगाने शेतकरी त्रस्त आहेत.

निकालाकडे लक्ष

पाथरुड : भूम तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाथरुड परिसरातील पाथरुडसह आनंदवाडी, सावरगाव, जेजला, तिंत्रज, जांब, बावी, दुधोडी, जयवंतनगर, आदी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. याची मतमोजणी सोमवारी होत असून, यात कोण बाजी मारणार याकडे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

‘रक्तपेढी सुरू करा’

कळंब : शहरात रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी बाबा भवर मित्र परिवाराकडून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर डॉ. ऋषिकेश भवर, अंगद बरगुले, महादेव वनकळस, अजय जाधव, श्रीकांत काटे, अभिजित मुळीक, मनोज शिंदे, आकाश धानवडे, किसन शिंदे, सौरभ मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे

बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर ते रामपूर रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडला आहे. रामपूर ते पेठसांगवी या २३ किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले आहे; परंतु सद्य:स्थितीत बलसूर ते रामपूर या चार किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या मार्गावरून सतत शेतकऱ्यांची तसेच रामपूर येथून बलसूर येथे दैनंदिन कामकाजासाठी ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र, या काटेरी झुडपामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असून, यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन धोकादायक काटेरी झुडपे काढावी, अशी मागणी बलसूर परिसरातील संदीप बिराजदार, ज्ञानेश्वर जंगाले, बाबूराव शेके, दगडू मोहळे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे.